India's misssion moon, chandrayaan 2 launch success
भारताचे Mission moon, चाँद के पार चलो... By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 7:00 PM1 / 11130 कोटी देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोच्या चांद्रयान-2 आज दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले.2 / 11श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून 'बाहुबली' रॉकेटच्या मदतीने चांद्रयान-2 यानाने दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले. 3 / 11हे उड्डाण पाहण्यासाठी इस्त्रोने 10000 लोक बसू शकतील अशी गॅलरी बनविली होती. आजच्या यशस्वी उड्डाणानंतर चांद्रयान-2 काही दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणास असून, त्यानंतर ते चंद्राच्या दिशेने रवाना होईल. तसेच 6 सप्टेंबर रोजी चांद्रयान चंद्रावर उतरेल.4 / 11पंतप्रधान नरेंद्र मोदीही या मोहिमेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्या कार्यालयातून पाहात होते, उड्डाणानंतर मोदींनीही आनंदीत होऊन टाळ्या वाजवल्या.5 / 11130 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचे उड्डाण असलेल्या चांद्रयान 2 च्या मोहिमेचा जल्लोष शाळांमध्येही पाहायला मिळाला.6 / 11चांद्रयान 2 यानाचे यशस्वी उड्डाण झाल्यानंतर इंस्रोचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि या मोहिमेचे प्रमुख के.सिवान यांनी उपस्थितांना आणि देशाला मार्गदर्शन करत चांद्रयान 2 ही मोहीम तिरंग्याचा सन्मान असल्याचे म्हटले.7 / 11चांद्रयान 2 चे यशस्वी उड्डाण झाल्यानंतर श्रीहरी कोटा येथे उपस्थित शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला, उड्डाणानंतर आनंदाच्या भरात एकमेकांना जादू की झप्पीही दिली.8 / 11इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनाही मोहीमेच्या यशानंतर अत्यानंद झाला, त्यांनी आपल्या सहकारी वैज्ञानिकांशी हस्तांदोलन करत सर्वांचे अभिनंदन केले9 / 11विजयानंतरचा हा क्षण... जादू की झप्पी देताच गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या कामाचा शिणवटा नाहीसा झाला असेल10 / 11चांद्रयान 2 च्या उड्डाणापूर्वी मिशन मूनची पाहणी करताना इस्रोचे प्रमुख के. सिवान आणि इतर शास्त्रज्ञ चिंतातूर होते, पण उड्डाण यशस्वी होताच त्यांच्यासह देशभरातील कोट्यवधी नागरिकांनी जल्लोष केला11 / 11जागतिक पातळीवर देशाचं नाव रोशन करणाऱ्या चांद्रयान 2 मोहीमेचं सेलिब्रेशन तरुणाईनेही केलं. आपल्या तिरंगा काही दिवसांतच चंद्रावर फडकणार असल्याची साक्षच हा फोटो देत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications