शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एलन मस्कपेक्षाही श्रीमंत, भारताच्या अखेरच्या निजामाचे निधन; हलाखीच्या परिस्थितीत तुर्कीत रहायचे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 3:53 PM

1 / 11
हैदराबादचे आठवे आणि अखेरचे निजाम मुकर्रम जाह बहादुर यांचे गुरुवारी निधन झाले. तुर्कीची राजधानी इस्तांबुलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तुर्कस्तानमध्ये ते हलाखीचे जीवन जगत होते. वाचून आश्चर्य वाटले असेल... निजाम आणि तो पण हलाखीत... हो हे खरे आहे.
2 / 11
निजामशाही आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच निजामशाहीचे अखेरचे निजाम होते बहादुर. एका छोट्याशा फ्लॅटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. या बहादुर यांचे आजोबा तेव्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जायचे.
3 / 11
मीर उस्मान अली खान यांच्या श्रीमंतीचे किस्से प्रसिद्ध आहेत. त्यांची एकूण संपत्ती 236 अब्ज डॉलर्स एवढी होती. म्हणजेच जवळपास 17.47 लाख करोड़ रुपये. 967 मध्ये वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
4 / 11
उस्मान अली यांच्याकडे रोल्स रॉयसचा ताफाच होता. त्याशिवाय त्यांच्याकडे सिल्व्हर घोस्ट थ्रोन कार होती. पेपरवेट म्हणून ते हिरा ठेवायचे. आज त्या हिऱ्याची किंमत १ हजार कोटी रुपये आहे.
5 / 11
हा हिरा उस्मान अली यांना वडील व सहावे निजाम महबूब अली खान यांच्याकडून मिळाला होता. ते हा हिरा अशुभ मानत असायचे. म्हणून त्यांनी तो हिरा आपल्या चपलांत ठेवला होता. परंतू, उस्मान अली यांनी या हिऱ्याची जागा आपल्या टेबलवर ठेवली, त्याचा पेपरवेट म्हणून शोभेसाठी वापर केला.
6 / 11
एवढा हा महागडा जेकोब हिरा इंग्रज आपल्यासोबत घेऊन गेले होते. भारत सरकारने खूप प्रयत्न करून हा हिला १९९५ मध्ये पुन्हा भारतात आणला, परंतू यासाठी खूप पैसे मोजावे लागले होते. आता तो आरबीआयकडे सुरक्षित आहे.
7 / 11
जेकब हिरा हा जगातील पाचवा सर्वात मोठा पॉलिश केलेला १८४ कॅरेटचा हिरा आहे. त्याचे वजन ४० ग्राम आहे. अलेक्झांडर मल्कान जेकबने 1891 मध्ये बेल्जियन व्यापाऱ्याकडून आणला होता, यामुळे या हिऱ्याचे नाव जेकब ठेवण्यात आले.
8 / 11
निजामाने हा हिरा त्याच्याकडून २५ लाखांना घेतला होता. जेकबला दुसरा खरेदीदार सापडत नव्हता. जेकबने हा हिरा पूर्ण पैसे देऊन खरेदी केला होता, परंतू त्या व्यापाऱ्याने त्याच्यावर खटला दाखल केला होता. यामुळे जेकबला पैशांची गरज होती, त्याचा फायदा निजामाने घेतला होता. १९२१ मध्ये जेकबचा कंगालीच्या अवस्थेत मृत्यू झाला होता.
9 / 11
हैदराबादवर १८ व्या शतकापर्यंत निजाम घराण्याची सत्ता होती. उस्मान अली हा एकमेव भारतीय शासक होता ज्यांना ब्रिटिश सरकारने 'महानते'चा दर्जा दिला होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांनी ब्रिटनला 25 मिलियन GBP दिले होते. भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच, निजामाने लंडनच्या वेस्टमिन्स्टर बँकेत 10 लाख GBP ची रक्कम हस्तांतरित केली होती.
10 / 11
मीर उस्मानला महागड्या गाड्यांचा शौक होता असे म्हणतात. त्यांच्या ताफ्यात 50 रोल्स रॉयस होत्या. वास्तविक रोल्स रॉइस मोटर कार्स लिमिटेडने त्यांना कार देण्यास नकार दिला. यानंतर निजामाने जुन्या रोल्स रॉयस गाड्या विकत घेतल्या आणि कचरा उचलण्यासाठी त्यांचा वापर सुरू केला होता.
11 / 11
परंतू स्वातंत्र्यानंतर निजामशाहीचे पतन झाले, एवढे की आठव्या निजामाला हलाखीत दिवस काढावे लागत होते. मस्क यांच्यापेक्षाही संपत्ती असलेल्या या निजामाच्या नातवावर ही परिस्थिती आली होती.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक