शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातील निमलष्करी सुरक्षा यंत्रणा

By admin | Published: May 25, 2015 12:00 AM

1 / 7
ASSAM RIFLES-- ब्रिटिशांच्या काळात (१८३५) साली स्थापन करण्यात आलेल्या या दलावर सध्या आसाममध्ये शांतता प्रस्थापित करण्याची व घुसखोरी रोखण्याची महत्वाची जबाबदारी आहे
2 / 7
COAST GAURD - भारतीय तटरक्षक दल नौदलाला पर्याय म्हणून हे दल कार्यरत असते. समुद्र मार्गे होणारी तस्करी व समुद्रातून होणा-या व्यापारावर लक्ष ठेवण्याचे महत्वाचे काम हे दल करते.
3 / 7
CISF - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या दलावर मुख्यतः विमानतळ व देशभरातील महत्वाच्या औद्योगिक संस्थांना संरक्षण पुरवण्याची जबाबदारी असते.
4 / 7
ITBP - इंडो- तिबेटियन बॉर्डर पोलीस भारत व चीनच्या सीमेवर या दलाचे जवान तैनात असतात हे एकमेव दल आहे ज्यामध्ये फक्त पुरुषांची भरती केली जाते.
5 / 7
BSF - बॉर्डर सिक्युरटी फोर्स देशभरातील सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवणारे दल म्हणून बॉर्डर सिक्युरीटी फोर्स आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेच. दहशतवादाचा सामना सीमाभागातील गुन्हेगारी व तस्करी रोखणे या करता या दलाचे जवान सदैव कार्यरत असतात.
6 / 7
SSB - सशस्त्र सीमा बल भारत व नेपाळच्या सीमेवर कार्यरत असणा-या या दलावर दोन्ही तस्करी रोखणं सीमाभागात शांतता प्रस्थापित करणं व नैसर्गिक आपत्ती आली असता दोन्ही देशांच्या जनतेला मदत करणं या करता या दलाची स्थापना करण्यात आली आहे. नेपाळमधील भुकंपग्रस्त जनतेसाठी या दलाने उल्लेखनीय कामगिरी बजावली.
7 / 7
CRPF - केंद्रीय राखीव पोलीस दल - देशभरातील दंगली व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाल्यावर जमाव हाताळण्यासाठी सर्व प्रथम या दलाला बोलवण्यात येतं.