खतरनाक! निधड्या भारताची सिक्रेट फोर्स; मोदींच्या दूताची लडाखमध्ये शहीद जवानास मानवंदना By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 7:15 PM
1 / 11 लडाखमधील एलएसीवरील तणावाला आता चार महिने झाले आहेत. चीनवर भारताने दबाव वाढविण्यास सुरुवात केली असून भारताच्या सिक्रेट फोर्सच्या तिबेटी शरणार्थी जवानाला मोदी सरकारकडून खुलेपणाने मानवंदना देण्यात आली आहे. 2 / 11 भारताने लडाख आणि त्या परिसरात लढण्यासाठी त्या वातावरणाची पुरेपूर माहिती असलेले धाडसी तिबेटी वीर तयार केले होते. हीच भारताची सिक्रेट फोर्स भारतीय जवानांच्या खांद्याला खांदा लावून चीनविरोधात लढा देत आहे. भारताने या सिक्रेट फोर्सबाबत कधीही खुलेपणाने प्रसिद्धी दिली नव्हती. 3 / 11 मात्र, आज या मनाने भारतीय बनलेल्या आणि भारतीय भूमीसाठी प्राण त्यागलेल्या तिबेटी शरणर्थी जवानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने भाजपाचे नेते राम माधव यांनी लडाखमध्ये जात मानवंदना दिली आहे. 4 / 11 या अंत्ययात्रेला मोठी गर्दी उसळली होती. यावेळी भारत माता की जय, असे नारे दुमदुमले होते. तसेच भारताच्या झेंड्यासोबत तिबेटचा झेंडाही लोकांच्या हाती फडकत होता. 5 / 11 भारतासाठी लेहमध्ये शहीद झालेल्या या जवानाचे नाव आहे नीमा तेंजिन. नीमा तेंजिन यांच्यावर पूर्ण सन्मानाने लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर भारताचा तिरंगा आणि तिबेटचा ध्वज लपेटण्यात आला होता. हा चीनसाठी मोठा इशारा मानला जात आहे. 6 / 11 दोन्ही देशांमध्ये तणाव कमालीचा वाढला आहे. भारताला तिबेटी जवानांच्या प्राण त्यागण्य़ावर गर्व असल्याचा संदेश चीनला देण्यात आला आहे. 7 / 11 तिबेटचे हे शरणार्थी 1959 मध्ये चीनविरोधातील अयशस्वी उठावावेळी भारतात दलाई लामा यांच्यासोबत आले होते. काही भारतीयही या फोर्समध्ये असतात. ही फोर्स 1962 च्या युद्धानंतर लगेचच बनविण्याच आली होती. या फोर्समध्ये 3500 जवान आहेत. 8 / 11 नीमा तेंजिन यांच्या अंत्ययात्रेमध्ये भारत मातेच्या जयजयकारासह स्वतंत्र तिबेटचेही नारे दुमदुमले होते. नीमा तेंजिन यांच्या अंत्यसंस्कारावेळी विकास रेजिमेंटचाही जयजयकार करण्यात आला. अनेकांच्या हातात बॅनर आणि पोस्टरही होते. काही चीनविरोधी पोस्टरही होते. 9 / 11 राम माधव यांनी या अंत्यसंस्काराचे फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले होते. मात्र, नंतर ते डिलीट करण्यात आले. 10 / 11 भारताची सिक्रेट बटालियन विकास रेजिमेंटचे निमा तेंजिन सदस्य होते. ही रेजिमेंट एलएसीवरील तैनात जवानांच्या खांद्याला खांदा लावून सीमेचे संरक्षण करते. 11 / 11 ही फोर्स भारतीय सैन्याच्या आदेशावर काम करते. 29-30 ऑगस्टच्या रात्री लडाखमध्ये जी चीनने घुसखोरी केली होती त्यावेळी एका भूसुरुंग स्फोटात नीमा यांना हौतात्म्य आले. आणखी वाचा