As India's strength grows, 12 sukhoi aircraft will enter the Air Force fleet
भारताची ताकद वाढणार, ही अत्याधुनिक विमाने हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 11:31 PM1 / 7लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये सुरू झालेला तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने आपली सामरिक ताकद वाढवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. 2 / 7त्यासाठी भारतीय हवाई दलाने १२ सुखोई आणि २१ मिग-२९ विमानांची तत्काळ खरेदी करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला पाठवला आहे. आता संरक्षण मंत्रालय या प्रस्तावावर पुढील आठवड्यात निर्णय घेईल. 3 / 7सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिग-२९ विमानांचे रशिया मॉडिफिकेशन करून त्यांना अद्ययावत बनवणार आहे. या विमानांमध्ये कालानुरूप बदल करण्याचा प्रस्ताव हवाई दलाने दिला आहे. 4 / 7२०१६ मध्ये राफेल विमानांच्या खरेदी करारावर सह्या केल्यानंतर आता हवाई दलात दाखल होणारा ३३ विमानांचा हा दुसरा ताफा असेल. 5 / 7हवाई दलाने विमानांसंबंधीची सर्व उपकरणे खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे भविष्यात खराब होणारे विमानांचे भाग दुरुस्त करता येतील. 6 / 7यापूर्वी रशियाने भारतीय हवाई दलाकडील लढाऊ विमानांची कमतरता भरून काढण्यासाठी नवीन लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता. 7 / 7जी नवीन विमाने खरेदी करण्याची योजना आहे ती आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि अपग्रेडेड असतील, असा दावा आधी करण्यात आला होता. भारतीय हवाई दलाकडे मिग-२९ विमाने आधीपासूनच आहेत. मात्र नव्या मिग-२९ विमानांचे रडार आणि अन्य उपकरणे ही आधुनिक मापदंडांना अनुरूप असतील. आणखी वाचा Subscribe to Notifications