भारत-पाक शांतीप्रक्रियेला वैचारिक बळ प्रदान करण्यासाठी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी चर्चासत्रात मान्यवर अतिथींना प्रश्न भारत-पाक संबंधाबाबत प्रश्न विचारण्यात आले.काश्मीरबाबत दोन्ही देशांची विचारसरणी वेगवेगळी असल्याचं मत यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केलं.पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी उपस्थित प्रेक्षकांना भारत-पाक चर्चेसंदर्भात संबोधित केलं. यावेळी प्रेक्षकांनी अब्दुल बासित यांचं भाषण ऐकलं. अनेक मान्यवरांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा सत्कार केला.भारत-पाकिस्तानच्या या चर्चासत्रावेळी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाईंनी व्यासपीठावर स्वतःचे विचार मांडले. भारत-पाकमध्ये एकमेकांचे पत्रकार पाहिजेत असं मत त्यांनी यावेळी मांडलं.भाजपाच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी यांनी भारत-पाक संबंधाबाबत उपस्थितांना संबोधित केलं.लोकमतनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला लोकमत मीडिया प्रा.लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी संबोधित केले. संवाद आणि चर्चेतूनच भारत-पाकदरम्यान संबंध सुधारू शकतात असे मत देवेंद्र दर्डा यांनी मांडलं.पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी शायरीने सुरुवात केली. यावेळी प्रेक्षकांनी त्यांना दाद दिली. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान असलेल्या तणावाचे मूळ कारण दहशतवाद नसून काश्मीरचा न सुटलेला प्रश्न हेच या समस्येचे मूळ आहे असं मत अब्दुल बासित यांनी मांडलं.पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्या उपस्थितीत भाजपाच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.