शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 9:26 AM

1 / 10
तैवानच्या लोकशाही पद्धतीने निवडल्या गेलेल्या सरकारला मोदी सरकारमधील दोन खासदारांनी पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केल्यानं चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी (सीसीपी)ला पोटशूळ उठला आहे.
2 / 10
भारतानं अशा प्रकारच्या कृत्यापासून दूर राहिले पाहिजे, असा इशारा चीननं भारताला दिला आहे. भाजपाचे दोन खासदार मीनाक्षी लेखी आणि राहुल कसवान हे तैवानचे नवनिर्वाचित अध्यक्ष त्साई इंग-वेन यांच्या शपथविधी सोहळ्यास व्हर्चुअली उपस्थित होते आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. त्साई यांनी आपल्या दुसर्‍या कार्यकाळासाठी शपथ घेतली.
3 / 10
या कार्यक्रमाला लेखी, कसवान आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांच्यासह 41 देशांतील 92 प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असल्यानं हे लोक आभासी स्वरूपात (व्हिडिओ कॉन्फरन्स) कार्यक्रमाद्वारे सामील झाले.
4 / 10
भारत सरकार या कार्यक्रमात थेट भाग घेऊ शकत नसल्याने हे दोन खासदार सत्ताधारी पक्ष भाजपाचे प्रतिनिधी म्हणून सामील झाले. या दोन खासदारांनी कार्यक्रमात भाग घेतल्यामुळे चीनने त्वरित निषेध केला.
5 / 10
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोणाचेही नाव न घेता अशी आशा केली की, सर्वजण तैवानच्या स्वातंत्र्यासाठी फुटीरतावादी कारवायांना विरोध करतील आणि चीनच्या धोरणाचं समर्थन करतील. दुसरीकडे नवी दिल्ली चिनी दूतावासाच्या ल्यू बिंगने लेखी आणि कासवान यांनी सोहळ्यात सहभाग घेतल्यामुळे आक्षेप नोंदवला आहे.
6 / 10
ल्यू बिंग यांनी पत्राची एक प्रतही माध्यमांकडे प्रसिद्धीस दिली आहे. ल्यू यांनी आपल्या तक्रारीत त्साई यांना लेखी आणि कसवान यांचे अभिनंदन संदेश पूर्णपणे चुकीचे आहेत, याची दुरुस्ती करण्यास सांगितले आहे. भारत सरकारने एक चीन धोरणाचे पालन करावे, असाही सल्ला त्यांनी दिला आहे.
7 / 10
७० वर्षांपूर्वी उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांचे स्पष्टीकरण देताना ल्यू म्हणाले की, राष्ट्रपती त्साई यांना अभिनंदन संदेश पाठविण्यासारख्या चुकीच्या कृतीमुळे फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन मिळेल आणि यामुळे या क्षेत्राच्या शांतता व समृद्धीला धोका निर्माण होईल.
8 / 10
त्यांनी भाजपच्या खासदारांना अशा प्रकारच्या कृत्यांपासून दूर राहण्यास सांगितलं आहे. ल्यू यांनी आपल्या पत्राद्वारे त्साई यांना चीनच्या तैवान प्रांताचा स्थानिक नेता म्हणून निवडल्याचे वर्णन केले आहे.
9 / 10
तर दुसरीकडे तैवानने स्वत: ला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आहे. चीनने तैवानवर दावा केला आहे.
10 / 10
तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणार्‍या देशांशी चीनचे चांगले संबंध नाहीत. आता भारतानं तैवानला पाठिंबा अन् शुभेच्छा दिल्यानं चीनचा तीळपापड झाला आहे.
टॅग्स :chinaचीनIndiaभारत