शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

International Day of Forests 2022: एक झाड वर्षभरात 100 किलो ऑक्सिजन देतो, जाणून घ्या जगातील मोठ्या जंगलांची स्थिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 12:30 PM

1 / 14
झाडे असतील तर पृथ्वीवरील पर्यावरण सुरक्षित असेल. जागतिक हवामान परिषदांनी पर्यावरण वाचविण्यावर गंभीरपणे विचारमंथन केले आहे. अशा परिस्थितीत झाडे लावणे, जंगलांची वाढ करणे हे आपल्या पृथ्वीच्या आणि त्यावरील सजीवांच्या जीवनासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. ऑक्सिजन वाढण्याबरोबरच हिरवीगार जंगले पर्यावरणाचा समतोलही राखतात.
2 / 14
अॅमेझॉनची जंगले जगातील 20 टक्के ऑक्सिजन निर्माण करतात. देश आणि जगातील वृक्ष आणि जंगलांची स्थिती आणि महत्त्व याबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी 21 मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात कधी झाली आणि या वर्षाची थीम काय आहे ते जाणून घ्या.
3 / 14
सर्व प्रकारच्या जंगलांच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी देशांना जंगले आणि वृक्षांशी संबंधित उपक्रम आयोजित करण्यासाठी स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. या उपक्रमांमध्ये वृक्षारोपण मोहिमेचाही समावेश आहे.
4 / 14
देशातील जंगलांची काय स्थिती आहे? सरासरी एक झाड एका वर्षभरात 100 किलो ऑक्सिजन देते. एका व्यक्तीला श्वास घेण्यासाठी वर्षभरात 740 किलो ऑक्सिजनची गरज असते. यावरुनच झाडांचे महत्व कळून येते. सध्या दररोज 2 लाख झाडे तोडली जात आहेत, पर्यावरण वाचवण्यासाठी 33 टक्के जमिनीवर 2800 कोटी झाडे लावावी लागतील.
5 / 14
भारतात गेल्या 18 वर्षांत (2000-2018) 16,744 चौरस किमी (17,200 कोटी चौरस फुटांपेक्षा जास्त) पसरलेली झाडे कापली गेली. म्हणजेच सुमारे 125 कोटी झाडे तोडण्यात आली. म्हणजेच दररोज सरासरी दोन लाख झाडे तोडली जात आहेत. मोठ्या शहरांबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2005 पासून दीड दशकात दिल्लीत 1.12 लाखांपेक्षा जास्त झाडे तोडण्यात आली आहेत. म्हणजेच येथे दर तासाला एक झाड नष्ट होत आहे.
6 / 14
NITI आयोगाच्या अहवालानुसार, भारतातील 21% पेक्षा जास्त जमिनीवर जंगल आहे, तर लक्ष्य 33% आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुमारे 3.76 लाख चौरस किमी क्षेत्रात लागवड करणे आवश्यक आहे. म्हणजेच किमान 2800 कोटी झाडे लावण्याची गरज आहे. आकडेवारीनुसार, 30 वर्षांत 23,716 औद्योगिक प्रकल्पांसाठी 14 हजार चौरस किलोमीटर जंगल साफ करण्यात आले.
7 / 14
ग्लोबल फॉरेस्ट वॉचनुसार एका जंगलात प्रति चौरस किलोमीटर 50 हजार ते 1 लाख झाडे आहेत. 2015 मध्ये जर्नल नेचरमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, मानवाने झाडे तोडण्यास सुरुवात केल्यापासून आतापर्यंत 46 टक्के झाडे तोडण्यात आली आहेत. जगात सध्या 3.04 लाख कोटी झाडे आहेत.
8 / 14
ट्रॉपिकल फॉरेस्ट अलायन्स 2020 नुसार, जर आपण कोणतेही बदल केले नाहीत तर 2030 पर्यंत 17 लाख चौरस किमीमध्ये पसरलेली उष्णकटिबंधीय जंगले संपुष्टात येतील. सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटने केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, जर झाडे आणि वनस्पती या दराने मरत राहिल्या तर 2050 पर्यंत भारताच्या क्षेत्रफळाइतकी जंगले नष्ट होतील.
9 / 14
दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन जंगल हे जगातील सर्वात मोठे जंगल आहे. ते जगातील 20 टक्के ऑक्सिजन तयार करतात. त्याच्या सीमा नऊ देशांशी सामायिक आहेत. यामध्ये ब्राझील, बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, सुरीनाम आणि फ्रेंच गयाना यांचा समावेश आहे.
10 / 14
या जंगलातील 60 टक्के भाग ब्राझीलमध्ये आहे. पण जगाला वरदान ठरलेल्या या अ‍ॅमेझॉनच्या जंगलांना दरवर्षी आगीच्या घटनांचा फटका बसत आहे. अलीकडच्या काळात, काही आग इतकी भीषण होती की, अनेक दिवस ऍमेझॉनचे जंगल धुमसत राहिले. याबाबत ब्राझील सरकारने केलेले प्रयत्नही अपुरे ठरले आहेत.
11 / 14
जंगलतोडीमुळे रोग वाहून नेणारे जीव, विशेषतः डास, निवासी भागात येतात. उदाहरणार्थ, झिका विषाणू 1940 च्या दशकात युगांडातील झिका जंगलातून आला होता. आफ्रिकेतील जंगले झपाट्याने कापली जात असून डेंग्यू, चिकुनगुनिया आणि यलो फिव्हरसारखे आजार या जंगलांतून आले आहेत.
12 / 14
अनेक अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की, जंगलतोडीमुळे रोग वाढतात. 1990 च्या दशकात रस्ते बांधण्यासाठी आणि शेतजमिनी वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगले तोडण्यात आली. त्यानंतर लगेचच, तेथील वार्षिक मलेरिया रुग्णांची संख्या वार्षिक 600 वरून 1.2 लाख झाली.
13 / 14
ब्राझीलमध्ये प्रकाशित झालेल्या एका जर्नलनुसार, 4 टक्के जंगल कापल्यामुळे मलेरियाच्या रुग्णांमध्ये 50 टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, अमेरिकन जर्नल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीनमधील अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, मलेरिया वाहक डास 278 पट जास्त वेळा जंगली भागाच्या तुलनेत जंगले तोडलेल्या भागात चावतात.
14 / 14
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने 28 नोव्हेंबर 2012 रोजी एक ठराव मंजूर करून दरवर्षी 21 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. प्रत्येक आंतरराष्ट्रीय वन दिनाची थीम कोलॅबोरेटिव्ह पार्टनरशिप ऑन फॉरेस्ट (CPF) द्वारे निवडली जाते. या वर्षी जागतिक वनीकरण दिन 2022 ची थीम 'वने आणि शाश्वत उत्पादन आणि उपभोग' आहे.
टॅग्स :forestजंगलenvironmentपर्यावरणPlantsइनडोअर प्लाण्ट्स