शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Omicron Variant : RT-PCR टेस्टच्या माध्यमातून ओमायक्रॉन व्हेरिएंट ओळखता येणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 5:02 PM

1 / 15
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 26 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 261,878,019 वर पोहोचली आहे. तर 5,219,784 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान काही ठिकाणी गंभीर परिस्थिती आहे.
2 / 15
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनेने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेल्या ओमायक्रॉन (Omicron Variant) व्हेरिएंटने खळबळ उडवली आहे. B.1.1.529 या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटला ओमायक्रॉन असं नाव देण्यात आलं आहे.
3 / 15
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न अर्थात चिंतेचा व्हेरिएंट असल्याचं म्हटलं आहे. या व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रविवारी जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटबद्दलची काही नवी माहिती नागरिकांना दिली.
4 / 15
इटलीच्या (Italy) रोममधील प्रतिष्ठीत बम्बिनो गेसु हॉस्पिटल (Bambino Gesu Hospital) ने दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट Omicron चा पहिला फोटो जारी केला आहे. यावरून हे स्पष्ट होत असल्याचा दावा केला जात आहे की, Omicron डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त म्यूटेशन होतं.
5 / 15
Omicron ची डिजीटल इमेज जारी करण्यात आली आहे. वैज्ञानिकांनुसार, Omicron च्या वरच्या भागात प्रोटीन असतं जे मानवी कोशिकांसोबत संपर्क करतं. याचा अर्थ असा अजिबात नाही की, Omicron जुन्या व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त म्यूटेट होतो म्हणजे Omicron डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त खतरनाक आहे.
6 / 15
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या RT-PCR टेस्टच्या माध्यमातून ओमायक्रॉन व्हेरिएंटचं निदान करणं शक्य आहे.
7 / 15
NGS-SA ने दिलेल्या माहितीनुसार, गौतेंग प्रांतामध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वेगाने पसरत आहे. हा संसर्ग अन्य प्रांतांमध्येही आधीच झाला असावा, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. वेगवेगळ्या क्लस्टर्समध्ये नवे रुग्ण आढळत असल्यामुळे सातत्याने एकूण रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
8 / 15
ओमायक्रॉन व्हेरिएंटचं म्युटेशन अत्यंत वेगळं असल्याचंही NGS-SA ने स्पष्ट केलं आहे. ओमायक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टा, अल्फा आदी यापूर्वीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त संसर्गजन्य आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
9 / 15
व्हेरिएंटमुळे नागरिकांना वेगाने संसर्ग होईल, असंही सांगता येत नाही किंवा ती गोष्ट नाकारताही येणार नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. RT-PCR टेस्टद्वारे हा व्हेरिएंट ओळखला जाऊ शकतो, ही त्यातल्या त्यात जमेची बाब असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.
10 / 15
ज्या व्यक्तींना कोरोना विषाणूच्या कोणत्याही प्रकारच्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे, त्यांना ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका जास्त आहे. तसंच, पूर्वी कोरोना संसर्ग होऊन त्यातून बऱ्या झालेल्या व्यक्तींना ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग सहजतेने होऊ शकतो, असंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.
11 / 15
आधी कोरोना संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.ओमायक्रॉन व्हेरिएंटपासून संरक्षण देण्यात कोरोनाप्रतिबंधक लशी किती प्रभावी ठरतील, हे समजून घेण्याचा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटनेसह (World Health Organization - WHO) अन्य संस्था-संघटना करत आहेत.
12 / 15
आतापर्यंत ज्यांनी लसीकरण केलं आहे, त्यांना या व्हेरिएंटपासून संरक्षण मिळणार की नाही, हे अद्याप ठामपणे सांगता येणार नाही. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेली व्यक्ती किती गंभीररीत्या आजारी पडू शकते, हे अद्याप नेमकं कळलेलं नाही.
13 / 15
ओमायक्रॉनची लक्षणं कोरोना विषाणूच्या अन्य व्हेरिएंटच्या लक्षणांसारखीच आहेत की वेगळी, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतल्या हॉस्पिटल्समध्ये संसर्गग्रस्तांची संख्या वाढली आहे; मात्र त्यामागे ओमायक्रॉन व्हेरिएंटच कारणीभूत आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
14 / 15
कोरोनाग्रस्तांची एकूण संख्याच वाढलेली असल्यामुळे हे झालेलं असू शकतं. दक्षिण आफ्रिकेतील तरुणांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळत आहेत. ओमायक्रॉनचं गांभीर्य किती आहे, हे कळण्यासाठी अजूनही काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.
15 / 15
सर्व तज्ज्ञांनी याच गोष्टीवर भर दिला आहे, की लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. नवा व्हेरिएंट समोर आला आहे, याचाच अर्थ असा आहे, की कोरोना महामारी अद्याप नष्ट झालेली नाही. त्यामुळे कोविड प्रोटोकॉल्सचं पालन करणं अत्यंत आवश्यक असल्याचंच यावरून स्पष्ट झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाOmicron Variantओमायक्रॉन