शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

International Yoga Day 2021: भारतातील सात महान योग गुरु, ज्यांच्यामुळे योग सातासमुद्रापार पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 10:04 AM

1 / 10
कोरोना संकट काळात लोकांना योगाचे महत्त्व अधिक चांगले समजण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीच्या या संकटामध्ये डॉक्टरांनी स्वतः लोकांना योग करण्याचा सल्ला दिला. हेच कारण आहे की आज संपूर्ण जग भारताला 'योगगुरू' असल्याचे मानते. लोकांना योगाबद्दल जागरूक करण्यासाठी 21 जून 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.
2 / 10
मात्र, योग परंपरेला समृद्ध करण्यासाठी काही प्रख्यात योगगुरूंनी मोठे योगदान दिले आहे, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? आज देश-विदेशातील लोक योग शिकण्यासाठी भारतात येतात. खरं तर हे त्याच योगगुरूंच्या परिश्रमांचे फळ आहे, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन योगाच्या नावाखाली समर्पित केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अशा काही महान योगगुरूंबाबत माहिती करुन घेऊया....
3 / 10
धीरेंद्र ब्रह्मचारी : धीरेंद्र ब्रह्मचारी हे इंदिरा गांधी यांचे योग शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी दूरदर्शन वाहिनीच्या माध्यमातून योगाला प्रोत्साहन देण्याचे काम सुरू केले होते. तसेच, त्यांनी दिल्लीच्या शाळांमध्ये आणि योग आश्रमात योगा करण्यास प्रारंभ केला होता. हिंदी व इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके लिहून त्यांनी योगाला प्रोत्साहन दिले होते. जम्मूत त्यांचे एक आलिशान आश्रम आहे.
4 / 10
बीकेएस अयंगर - योगाला जगभरात मान्यता देण्यात बीकेएस अयंगर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 'अयंगर योग' यांच्या नावाने त्यांचे योग स्कूल सुद्धा आहे. या शाळेच्या माध्यमातून त्यांनी जगभरातील लोकांना योगाबद्दल जागरूक केले होते. 2004 मध्ये टाईम मासिकाने त्यांना जगातील पहिल्या 100 प्रभावी लोकांपैकी एक म्हणून घोषित केले होते. याशिवाय, त्यांनी पतंजलीच्या योगसूत्रे नव्याने परिभाषित केली. योगा बायबल म्हणून ओळखले जाणारे 'लाइट ऑन योग' नावाचे पुस्तकही त्यांचे आहे.
5 / 10
कृष्णा पट्टाभी जोइस- कृष्णा पट्टाभी जोइस देखील एक उत्तम योग शिक्षक होते. त्यांचा जन्म 26 जुलै 1915 रोजी झाला होता, तर 18 मे 2009 रोजी त्यांचा मृत्यू झाला. कृष्णा यांनी अष्टांग विन्यास योग शैली विकसित केली. त्यांच्या अनुयायांमध्ये मडोना, स्टिंग आणि ग्विनेथ पॅल्ट्रो सारख्या मोठ्या नावांचा समावेश होता.
6 / 10
तिरुमलाई कृष्णामचार्य - तिरुमलाई कृष्णामचार्य यांना 'आधुनिक योगाचे जनक' म्हटले जाते. हठयोग आणि विन्यासला पुनरुज्जीवित करण्याचे सर्व श्रेय त्यांना जाते. तिरुमलाई कृष्णमचार्य यांना आयुर्वेदाचीही माहिती होती. ते योग आणि आयुर्वेदाच्या मदतीने त्यांच्याकडे उपचारांसाठी आलेल्या लोकांना बरे करत होते. म्हैसूरच्या महाराजाच्या काळात त्यांनी योगाला भारतभर एक नवी ओळख दिली होती.
7 / 10
परमहंस योगानंद : परमहंस योगानंद आपल्या 'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी' या पुस्तकासाठी ओळखले जातात. त्यांनी पाश्चिमात्य लोकांमध्ये मेडिटेशन आणि क्रिया योगाची ओळख करुन दिली. एवढेच नव्हे तर परमहंस योगानंद हे योगाचे पहिले आणि प्रमुख शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात बहुतेक वर्षे अमेरिकेत घालवली.
8 / 10
स्वामी शिवानंद सरस्वती : स्वामी शिवानंद सरस्वती हे पेशाने डॉक्टर होते. त्यांनी योग, वेदांत आणि इतर अनेक विषयांवर 200 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. 'शिवानंद योग वेदांत' या नावाने त्यांचे योग केंद्र आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या केंद्रासाठी समर्पित केले होते. त्यांनी योगासह कर्म आणि भक्ती एकत्र करून जगभर योगाचा प्रचार केला होता.
9 / 10
महर्षि महेश योगी : महर्षि महेश योगी हे देश आणि जगातील 'ट्रांसैडेंटल मेडिटेशन' चे एक प्रख्यात गुरु होते. बरेच सेलेब्रिटी त्यांना आपल्या गुरू मानतात. ते योगासाठी जगभर ओळखला जातात. श्री श्री रविशंकर हे महर्षि महेश योगी यांचे शिष्य आहेत.
10 / 10
दरम्यान, देशातील सर्व मोठे योग तज्ज्ञ आपल्या पद्धतीने योगाद्वारे निरोगी राहण्याची कला परिभाषित करीत आहेत. परंतु सध्याच्या युगात मोठे डॉक्टर आणि वैज्ञानिकही त्याचे महत्त्व समजून घेत आहेत. हेच कारण आहे की आज संपूर्ण जग सातवा योग दिवस साजरा करीत आहे.
टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनYogaयोग