IPS officer aparna kumar handling the rescue operation in Uttarakhand glacier burst
7 अजस्त्र पर्वत सर केले, आज उत्तराखंडमध्ये रेस्क्यू ऑपरेशन हाताळतेय ही IPS ऑफिसर By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 7:53 PM1 / 11उत्तराखंडच्या चमोलीमध्ये जो हिमकडा कोसळला त्यामध्ये 200 हून अधिक कामगार, इंजिनिअर अडकले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी आयटीबीपी, लष्कराचे जवान, हवाई दलासह हजारो लोक अहोरात्र काम करत आहेत. 2 / 11आयटीबीपीला या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासोबतच बॉर्डरला जोडणारे पूलदेखील उभारायचे आहेत. कारण सीमेवर तैनात असलेल्या जवानांशी रस्ते मार्गाने संपर्क तुटला आहे. हवाई मार्गाने हवामान ठीक असले तरच मदत पोहोचविता येणार आहे. 3 / 11एवढ्या सगळ्या संकटात आयटीबीपीला सुरुंगामध्ये अडकलेल्या सर्व जणांना सुखरूप बाहेर काढण्याचा विश्वास आहे. परंतू जिथे नजर जाईल तिथे चिखल आणि दगडच दिसत आहेत. 4 / 11या धाडसी आयटीबीपीच्या जवानांच्या टीमला एक महिला आयपीएस अधिकारी लीट करत आहे. त्यांचे नाव आहे अपर्णा कुमार. 5 / 11सरकारने उत्तराखंडच्या रेस्क्यू ऑपरेशनची सारी भिस्त अपर्णा यांच्या खांद्यावर टाकली आहे. त्या आयटीबीपीच्या डीआयजी आहेत. कर्नाटकच्या शिमोगाच्या त्या राहणाऱ्या आहेत. दैनिक भास्करने याबाबतचे वृत्त दिले आहे. 6 / 11सरकारने उत्तराखंडच्या रेस्क्यू ऑपरेशनची सारी भिस्त अपर्णा यांच्या खांद्यावर टाकली आहे. त्या आयटीबीपीच्या डीआयजी आहेत. कर्नाटकच्या शिमोगाच्या त्या राहणाऱ्या आहेत. दैनिक भास्करने याबाबतचे वृत्त दिले आहे. 7 / 11अपर्णा या 2002 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे शाळेतील शिक्षण कर्नाटकमध्येच झाले,. त्या BA-LLB आहेत. त्यांचे पती संजय कुमार हे देखील उत्तर प्रदेश केडरचे आएएस अधिकारी आहेत. 8 / 11अपर्णा यांनी जगातील सर्वात उंच अशा 7 पर्वतांवर चढाई केली आहे. माऊंट एव्हरेस्ट, माऊंट किलिमंजारो, कार्सटेंस पिरॅमिड, विन्सन मैसिफ, माउंट एकांकागुआ आणि माउंट डेनाली वर त्यांनी तिरंगा फडकविला आहे. यांना जगातील ‘7 समिट्स’ म्हटले जाते. 9 / 112017 मध्ये त्यांनी नेपाळमधील माऊंट मानसालुवर तिरंगा फडकविला आहे. दक्षिण ध्रुवावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. 2019 मध्ये त्यांनी उणे 40 डिग्री तापमानात दक्षिणी ध्रुवावर पाऊल ठेवले होते. अमेरिकेच्या माऊंट डेनालीवर पाऊल ठेवत त्यांनी 7 समिट्स सर केल्याचे रेकॉर्ड केले होते. 10 / 112002 मध्ये त्यांनी पहिल्यांदा बर्फाळ पर्वत पाहिला होता. तेव्हा त्या मसुरीमध्ये ट्रेनिंग घेत होत्या. तेव्हाच त्यांनी या पर्वतरांगा सर करण्याचे मनी बांधले होते. 11 / 11मात्र, पहिले पाऊल टाकायला त्यांना 11 वर्षे लागली. 2013 मध्ये त्यांनी माउंटेनियर फाउंडेशनचा कोर्स केला होता. तेव्हा त्यांचे वय़ 39 होते. आणखी वाचा Subscribe to Notifications