आधी शिक्षिका मग बँकेत नोकरी आता थेट IPS अधिकारी; प्रेग्नेंसीच्या नवव्या महिन्यांत दिलेली UPSC
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:44 IST
1 / 11यश कधीच सोप्या मार्गाने येत नाही, ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. पूनम दलाल ही अशीच एक महिला आहे जिने कठोर परिश्रम, जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी UPSC परीक्षेची तयारी कशी सुरू केली हे जाणून घेऊया...2 / 11पूनम दलाल या हरियाणातील झज्जर येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांचा जन्म दिल्लीत झाला. 2002 मध्ये 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी GBT कोर्स केला आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांनी त्यांना MCD स्कूल, रोहिणी, नवी दिल्ली येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. नोकरीसोबतच त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली.3 / 11ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्या विविध बँक पीओ परीक्षांसाठी बसल्या. त्यांनी सर्व परीक्षा यशस्वीरीत्या क्लिअर केल्या आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला.4 / 11SBI मध्ये 3 वर्षे काम केल्यानंतर, पूनम यांनी 2006 मध्ये SSC ग्रॅज्युएट स्तराची परीक्षा उत्तीर्ण केली आणि संपूर्ण भारतात 7 व्या क्रमांकावर आला. यानंतर ती आयकर विभागात रुजू झाल्या. या यशामुळे पूनम यांना आणखी आत्मविश्वास मिळाला आणि त्य़ा यूपीएससी परीक्षेला बसण्याची इच्छा बाळगून होत्या.5 / 112007 मध्ये पूनमचे लग्न नवी दिल्लीतील सीमाशुल्क उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असीम दहियासोबत झालं. पूनम यांना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं आणि पाठिंबा दिला. लग्नानंतर पूनमने नोकरी आणि अभ्यास सुरू ठेवला. वयाच्या 28 व्या वर्षी पूनमने पहिल्यांदा यूपीएससी सीएसईची परीक्षा दिली.6 / 11हरियाणा पीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि 2011 मध्ये हरियाणा पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झाल्या. यूपीएससी परीक्षा देण्याची दुसरी संधी त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते. त्यांनी आधीच हरियाणा पोलिसात डीएसपी म्हणून पूर्णवेळ नोकरी केली होती, तसेच त्या UPSC प्रिलिम्स देताना 9 महिन्यांच्या गर्भवती होत्या.7 / 11पूनम यांना 275 गुणांसह प्रिलिम पास केली. जेव्हा त्या मेन्ससाठी बसल्या तेव्हा त्यांचं बाळ फक्त 3 महिन्यांचे होतं. कठीण परिस्थिती असूनही, पूनम यांनी UPSC परीक्षेत तब्बल 897 गुणांसह 308 वा क्रमांक मिळवला. पूनम दलाल सध्या एसीपी म्हणून कार्यरत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 8 / 11सर्व फोटो - सोशल मीडिया9 / 11सर्व फोटो - सोशल मीडिया10 / 11सर्व फोटो - सोशल मीडिया11 / 11सर्व फोटो - सोशल मीडिया