IPS Success story Prem Sukh delu got 12 government jobs in 6 years
नेत्रदिपक भरारी! 6 वर्षात 12 सरकारी नोकऱ्या अन् झाला IPS ऑफिसर; 'असा' होता संघर्षमय प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 3:04 PM1 / 10UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. राजस्थानमध्ये राहणारे एक असे अधिकाऱी आहेत, जे इतरांना प्रेरणा देतात. प्रेम सुख डेलू असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्यांना सहा वर्षांत तब्बल 12 सरकारी नोकऱ्या मिळाल्या. त्यांचा संघर्षमय प्रवास जाणून घेऊया...2 / 10राजस्थानच्या बिकानेर येथील रहिवासी असलेल्या प्रेम सुख डेलू यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला, परंतु कठोर परिश्रमाने त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. ते यूपीएससी परीक्षेची तयारी करत राहिले आणि आयपीएस अधिकारी झाले आहेत. संपूर्ण गावाला त्यांचा अभिमान आहे. 3 / 10प्रेम सुख डेलू यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्याचे वडील उंटगाडी चालवायचे आणि लोकांचे सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत. लहानपणापासून प्रेम यांना आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढायचे होते आणि त्याचे लक्ष फक्त अभ्यासावर होते.4 / 10प्रेम सुख डेलू यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांच्याच गावातील सरकारी शाळेतून घेतले, त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण बिकानेरच्या शासकीय डूंगर महाविद्यालयातून केले. त्यांनी इतिहासात एमए केले आणि गोल्ड मेडल जिंकले. तसेच त्यांनी इतिहासात UGC-NET आणि JRF परीक्षा उत्तीर्ण केल्या.5 / 10प्रेम सुख डेलू यांचा मोठा भाऊ राजस्थान पोलिसात कॉन्सेबल आहे आणि त्यांनीच प्रेम यांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रेरित केले. 2010 मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भरतीसाठी अर्ज केला आणि त्यात ते यशस्वी झाले.6 / 10प्रेम सुख डेलू यांनी राजस्थान ग्राम सेवक परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावला, त्यानंतर त्यांनी संपूर्ण राजस्थानमध्ये असिस्टंट जेलर परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला. जेलरचे पद घेण्यापूर्वीच उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल लागला आणि त्यांची निवड झाली. तरीही ते थांबले नाही. 7 / 10नेट आणि बीएड परीक्षा उत्तीर्ण झाले. यानंतर त्यांना महाविद्यालयात लेक्चरर पद मिळाले. यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. एका महाविद्यालयात शिकवत असताना, प्रेम सुख यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला आणि राजस्थान प्रशासकीय सेवेत तहसीलदार म्हणून त्यांची निवड झाली. तहसीलदारपद भूषवत त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. 8 / 10शिफ्ट संपवल्यावर, प्रेम यांनी 2015 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला आणि पास झाले. त्यांनी AIR 170 मिळवले आणि IPS झाले. त्यांना गुजरात केडर मिळाले आणि त्यांची पहिली पोस्टिंग गुजरातमधील अमरेली येथे एसीपी म्हणून झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो - सोशल मीडिया)9 / 10शिफ्ट संपवल्यावर, प्रेम यांनी 2015 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला आणि पास झाले. त्यांनी AIR 170 मिळवले आणि IPS झाले. त्यांना गुजरात केडर मिळाले आणि त्यांची पहिली पोस्टिंग गुजरातमधील अमरेली येथे एसीपी म्हणून झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो - सोशल मीडिया)10 / 10शिफ्ट संपवल्यावर, प्रेम यांनी 2015 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला आणि पास झाले. त्यांनी AIR 170 मिळवले आणि IPS झाले. त्यांना गुजरात केडर मिळाले आणि त्यांची पहिली पोस्टिंग गुजरातमधील अमरेली येथे एसीपी म्हणून झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो - सोशल मीडिया) आणखी वाचा Subscribe to Notifications