शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अब्दुल कलामांना भेटून प्रेरणा मिळाली, इस्रोची नोकरी नाकारली; पहिल्याच प्रयत्नात IPS झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 3:11 PM

1 / 9
UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. उमेदवार दररोज 15-16 तास तयारीच्या अभ्यासात गुंतलेले असतात, तरीही फार कमी लोकांना यश मिळतं. काही लोक परीक्षेच्या तयारीसाठी नोकरीही सोडतात.
2 / 9
आयपीएस अधिकारी तृप्ती भट्ट यांची अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना इस्रोमध्ये शास्त्रज्ञाच्या नोकरीसाठी बोलावण्यात आले. याशिवाय त्यांना सरकारी नोकरीच्या अनेक संधीही मिळाल्या. पण, तृप्ती यांनी हे सर्व नाकारलं.
3 / 9
UPSC ची तयारी सुरू केली आणि शेवटी परीक्षा पास झाल्या. अब्दुल कलाम यांच्याकडून त्यांना आयपीएस बनण्याची प्रेरणा मिळाली. नववीत शिकत असताना डॉ. अब्दुल कलाम यांच्याशी त्यांची भेट झाली.
4 / 9
डॉ. कलाम यांनी तृप्ती यांना स्वतः लिहिलेलं एक पत्र भेट म्हणून दिलं होतं, जे वाचून तृप्ती यांना प्रेरणा मिळाली. त्या पत्राने प्रेरित होऊन तृप्ती यांनी आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी यूपीएससीची तयारी सुरू केली.
5 / 9
तृप्ती यांचे आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली आणि यश मिळवले. पहिल्याच प्रयत्नात तृप्ती यूपीएससी परीक्षेत 165 वा क्रमांक मिळवून आयपीएस अधिकारी बनल्या.
6 / 9
IPS तृप्ती भट्ट या राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन आणि मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक विजेत्या देखील आहेत. अल्मोडा येथील रहिवासी असलेल्या तृप्ती यांचा जन्म एका शिक्षक कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बीरशेबा शाळेतून झाले आणि केंद्रीय विद्यालयातून बारावी पूर्ण केली.
7 / 9
मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर तृप्ती यांनी सहा सरकारी नोकऱ्यांसाठीची परीक्षाही उत्तीर्ण केली. याशिवाय त्यांना इस्रो आणि अनेक खासगी संस्थांकडून नोकरीच्या ऑफरही आल्या. पण रात्रंदिवस काम करून त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं.
8 / 9

9 / 9

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी