irctc indian railways 100 special trains soon all you need know
प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! आणखी 100 ट्रेन धावण्याची शक्यता, लवकरच मिळू शकतो दिलासा? By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 11:06 AM1 / 12देशात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 36 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. 2 / 12लॉकडाऊन दरम्यान सध्या काही स्पेशन ट्रेन चालवण्यात येत आहेत. मात्र लवकरच भारतीय रेल्वेकडून आणखी 100 रेल्वे चालवण्यात येण्याची घोषणा होऊ शकते. 3 / 12येत्या काही दिवसांत येणारे सण लक्षात घेऊन रेल्वेकडूनही नागरिकांच्या सुविधेसाठी ही तयारी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. 4 / 12सध्या रेल्वेकडून केवळ 230 एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये 30 राजधानीचा समावेश आहे. या सर्व ट्रेन 'स्पेशल ट्रेन' म्हणून चालवण्यात येत आहेत. 5 / 12आणखी चालवण्यात येणाऱ्या 100 ट्रेनही स्पेशल पद्धतीने चालवण्यात येतील. या ट्रेन राज्यांतर्गत आणि आंतरराज्यही असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्रालयाला यासाठी गृह मंत्रालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे.6 / 12येत्या दोन महिन्यांत रेल्वेकडून जारी करण्यात येणाऱ्या झिरो-बेस्ड टाईमटेबलमध्ये या ट्रेन्सच्या वेळेमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. 7 / 12रेल्वे मंत्रालयाने टप्प्याटप्यात परिस्थिती रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं म्हटलं आहे. याआधी प्रवाशांच्या मागणीमुळे ट्रेन चालवण्याचा प्लॅन होता. मात्र कोरोनाची संकट पाहता हे पुढे ढकलण्यात आलं. 8 / 12केंद्र सरकारने 'अनलॉक 4' अंतर्गत सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून मेट्रो रेल्वे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गाचा प्रवास मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची शक्यता आहे. 9 / 12सणांचेही दिवस आहेत त्यामुळे रेल्वेची मागणी वाढू शकते. तसेच रेल्वे अधिकाऱ्यांकडून जेईई-एनईईटीच्या विद्यार्थ्यांनाही दिलासा देण्यात आला आहे. 10 / 12मुंबई आणि उपनगराचे विद्यार्थी केवळ आपलं परीक्षेचं अॅडमिट कार्ड दाखवून या रेल्वेतून प्रवास करू शकतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 12मुंबई आणि उपनगराचे विद्यार्थी केवळ आपलं परीक्षेचं अॅडमिट कार्ड दाखवून या रेल्वेतून प्रवास करू शकतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 12मुंबई आणि उपनगराचे विद्यार्थी केवळ आपलं परीक्षेचं अॅडमिट कार्ड दाखवून या रेल्वेतून प्रवास करू शकतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications