शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेवेळी उल्लेख केलेलं कच्चतीवू नेमकं आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 11:57 PM

1 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी विरोधी पक्षांवर टीका करताना त्यांना कच्चतीवू काय आहे हे त्यांना माहिती आहे का? असा सवाल मोदींनी विचारला.
2 / 6
मोदींनी संसदेत केलेल्या कच्चतीवूच्या उल्लेखानंतर हे कच्चतीवू नेमकं काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
3 / 6
लोकसभेत बोलताना मोदींनी मणिपूरमध्ये ज्या घटना घडल्या आहेत. त्या अक्षम्य आहेत. मात्र तिथे सुरू असलेले प्रयत्न पाहता तिथे शांततेचा सूर्योदय लवकरच होईल. याचवेळी मोदींनी कच्चतीवूबाबत प्रश्न विचारला. सभागृहाबाबेर जावून जे कान लावून ऐकत आहेत, त्या विरोधी पक्षातील नेत्यांनी कच्चतीवूबाबत सांगावं.
4 / 6
मोदींनी ज्या कच्चतीवूचा उल्लेख केला. ते कच्चतीवू हे तामिळनाडूच्या किनाऱ्यावरील एक बेट आहे. निर्मनुष्य असलेल्या या बेटावर सध्या श्रीलंकेचं नियंत्रण आहे.
5 / 6
१९७६ पर्यंत हा भाग भारत आणि श्रीलंकेमधील वादग्रस्त क्षेत्र होते. हे बेट नेदुन्तीवू, श्रीलंका आणि रामेश्वरम (भारत) यांच्या दरम्यान आहे. पारंपरिकरीत्या या बेटाचा वापर हा श्रीलंकेमधील तामिळ आणि तामिळनाडूमधील मच्छिमारांकडून केला जातो. १९७४ मध्ये भारताने या बेटाचा मालकी हक्क श्रीलंकेला सोपवला होता.
6 / 6
सुमारे १.१५ चौकिमी क्षेत्र असलेले हे बेट श्रीलंकेकडे सोपवताना भारताने काही अटी घातल्या होत्या. त्यानुसार भारतीय मच्छिमारांचा येथे मच्छिमारी करण्याचा हक्क सुरक्षित राहील, असं निश्चित करण्यात आलं. मात्र गेल्या काही काळापासून या बेटावरून वाद निर्माण झालेला आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNo Confidence motionअविश्वास ठरावTamilnaduतामिळनाडूcongressकाँग्रेसSri Lankaश्रीलंका