isro spark virtual space museum
ISRO ने लाँच केले SPARK, पहिले 3D व्हर्च्युअल स्पेस म्युझियम! By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 5:42 PM1 / 8इस्रोने (ISRO) स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव करत आपले व्हर्च्युअल म्युझियम स्पार्क (SPARK) सुरू केले आहे. हे एक डिजिटल कंटेंट आहे, ज्यामध्ये इस्त्रोचा इतिहास आणि यश दाखविले आहे. हे पाहिल्यावर एखाद्या खऱ्या जागेची माहिती देणारा सुरुवातीचा व्हिडिओ वाटतो.2 / 8इस्रोने https://spacepark.isro.gov.in नावाची साइट सुरू केली आहे. ज्यावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती, फोटो, व्हिडिओ पाहू शकता. हे सर्व इस्रोच्या इतिहासाशी आणि प्रक्षेपणाशी संबंधित आहेत. मिशन कथा, रॉकेट, उपग्रह आणि इतर वैज्ञानिक मोहिमांची माहिती उपलब्ध आहे. या वेबसाइटची बीटा व्हर्जन इस्रोच्या साइटवर उपलब्ध आहे.3 / 8स्पार्क (SPARK) हे इस्रोचे पहिले 3D व्हर्च्युअल स्पेस टेक पार्क आहे. या स्पार्कमध्ये एक म्युझियम आहे. थिएटर आहे. एक वेधशाळा आणि उद्याने देखील आहेत. चिल्ड्रन प्ले पार्क व्यतिरिक्त, वास्तविक आकाराचे रॉकेट देखील दाखवले आहेत. तलावाच्या काठावर उपहारगृह आहे. हे स्पार्क समुद्राच्या काठावर बांधले आहे.4 / 8स्पार्कचे (SPARK) म्युझियम हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ज्यामध्ये इस्रो, उपग्रह आणि लाँच व्हिकल्सबद्दल सांगितले आहे. तसेच, इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कथा आहेत, ज्यांनी इस्रोची निर्मिती केली, ती पुढे नेली आणि यशस्वी केली.5 / 8तुम्ही स्पार्कच्या साइटवर अप अँड डाऊन ऍरोसह स्पार्कचा वरचा आणि खालचा भाग पाहू शकता. व्हिडिओ प्ले करू शकता. तसेच, लेफ्ट अँड राइट ऍरोमधून पार्कचा 360 डिग्री व्ह्यू पाहू शकता. या पार्कमध्ये लोक ये-जा करताना दाखवले आहेत. निसर्गासोबतच विज्ञानाशी संबंधित माहितीही दाखवली आहे.6 / 8यामध्ये स्पेस ऑन व्हील्स नावाची बस दाखवली आहे. मुले त्याकडे जातात आणि अंतराळाशी संबंधित त्यांना कुतूहल वाटते. त्याच्या जवळच वेधशाळा दाखवली आहे. वेधशाळेच्या आत एक मोठी दुर्बिण बसवण्यात आली आहे. जिथे विश्वाची रहस्ये जाणून घेता येतात.7 / 8याचबरोबर, येथे सोलर सिस्टीम पार्क देखील आहे. ज्यामध्ये सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरलेले दाखवले आहेत. त्यांची माहिती प्रत्येक ग्रहाच्या खाली दिलेली आहे. संपूर्ण स्पार्कचे दृश्य इतके सुंदर आहे की, ते पाहून आनंद होतो. 8 / 8याशिवाय गार्डन आहे. कारंजे आहेत. एका बाजूला तलाव आणि दुसऱ्या बाजूला समुद्र दाखवला आहे. विशेष म्हणजे, सेल्फी पॉईंट आहे. त्या ठिकाणी I Love ISRO असे बनवले आहे. ज्याच्या मागे म्युझियम आणि तीन रॉकेट्स दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications