शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशभरात अशी साजरी होते वंसत पंचमी, वाचा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 10:46 PM

1 / 6
आज (22 जानेवारी, सोमवार) वसंत पंचमी आहे. वसंत पंचमी केवळ धार्मिकच नाही तर वास्तूच्या दृष्टीकोनातूनही खास मानली जाते
2 / 6
माघ मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला वसंत पंचमीचे पर्व मानले जाते. यादिवशी ज्ञानदेवता म्हणजे माता सरस्वतीची पूजा केली जाते.
3 / 6
देशभरात वसंत पंचमी साजरी केली जाते. हे पर्व साजरे करण्यामागे अनेक धार्मिक कथा.
4 / 6
भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता - सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे.
5 / 6
वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व आहे. हा दिवस देवीचा प्रकटदिन म्हणून मानला जातो
6 / 6
भारतातीलच नव्हे तर फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पश्चिम पंजाबात सुद्धा वसंतपंचमी ही पतंगोत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते.