शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ram Mandir: मोदींनी भूमिपूजन करून दोन वर्षं झाली, राम मंदिराचं बांधकाम किती झालं? रामलल्लांची प्रतिष्ठापना कधी होणार? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 4:10 PM

1 / 6
आजपासून दोन वर्षांपूर्वी म्हणजेच ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम जन्मभूमीवर राम मंदिराच्या बांधणीसाठी भूमिपूजन केले होते. तेव्हापासून या ठिकाण राम मंदिराच्या निर्मितीचं काम सुरू झालं. मिळालेल्या माहितीनुसार मंदिराच्या गर्भगृहाजवळ बांधण्यात येत असलेल्या दगडी प्रदक्षिणा मार्गाचे काम ३० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. तसेच स्वरूप मंदिराच्या चौथऱ्याचं काम या महिन्यामध्ये पूर्ण करण्यात येईल.
2 / 6
रामलल्लांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही मंदिराच्या निर्मितीचं काम दिसू लागलं आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार जानेवारी २०२४ पर्यंत रामलल्लांची गर्भगृहात प्रतिष्ठापना केली जाईल.
3 / 6
मंदिराच्या बांधकामातील प्लिंथ निर्मितीचं तीन चतुर्थांश काम पूर्ण झालं आहे. एक महिन्याच्या आत प्लिंथ निर्मितीचं काम पूर्ण होईल. राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचं काम जून महिन्यापासून सुरू झालं होतं. पहिल्या मजल्यावरच गर्भगृहाचं बांधकाम होणार आहे. आता याच्या चौथ्या लेअरचं काम सुरू आहे. गर्भगृहाच्या प्रदक्षिणा मार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर गर्भगृहाच्या खोलीचं बांधकाम सुरू होईल.
4 / 6
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या अनिल मिश्र यांनी सांगितले की, राम जन्मभूमी परिसरात मंदिर निर्मितीसाठी चौथरा तयार करण्याचं काम सुरू आहे. सुमारे २१ फूट उंच असलेला हा चौथरा ग्रॅनाईटच्या दगडांपासून तयार करण्यात येत आहे. यामध्ये १७ हजार दगड वापरण्यात येतील. त्यापैकी ५ हजार दगड आतापर्यंत आले आहेत.
5 / 6
ऑगस्टच्या अखेरीस प्लिंथच्या ३५० गुणिले २५० क्षेत्रावर ग्रॅनाईटचे दगड लावण्याचं काम सुरू होईल. तसेच त्याच्या पूर्ण बेसवर मुख्य मंदिराच्या निर्मितीचं काम सुरू होईल. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या पहिल्या मजल्याचं बांधकाम २०२३ पर्यंत पूर्ण होईल.
6 / 6
त्याबरोबरच अयोध्येतील श्रीराम मंदिर हे भाविकांसाठी खुलं होईल. मंदिराच्या दोन अन्य मजल्यांचं काम सुरू राहील. मंदिर निर्मितीसाठीचं काम योजनेनुसार सुरू राहिलं तर २०२५ पर्यंत याचं काम पूर्ण होईल.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी