'It is impossible for NCP to unite with Shiv Sena in Bihar elections', prafulla patel
'बिहार निवडणुकीत शिवसेनेसोबत एकत्र येणं राष्ट्रवादीला अशक्य' By महेश गलांडे | Published: October 13, 2020 4:59 PM1 / 11बिहारमध्ये काँग्रेसने आधीच त्यांची आघाडी जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जदयु आणि भाजपचे जागा वाटप झालेले आहे. 2 / 11मायावतींच्या बसपाने असादुद्दीन ओविसी यांच्या एमआयएमसोबत ‘वंचित’ आघाडी उभारली आहे. तर, शिवसेना यापूर्वीच एनडीएतून बाहेर पडली आहे. 3 / 11शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. 4 / 11काँग्रेस आणि राजदसोबत एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती. बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल, वरिष्ठ नेते अहमद पटेल, तसेच राजदचे तेजस्वी यादव यांच्याशी आपण याबाबत चर्चा केली होती.5 / 11राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी प्रदेश कार्यालयात माध्यमांना दिली.6 / 11आम्ही जास्त जागांसाठी आग्रहीदेखील नव्हतो पण एकत्र लढण्याची काँग्रेसची मानसिकता दिसली नाही. त्यामुळे आता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे असे प्रफुल पटेल म्हणाले. 7 / 11एकत्र येऊन बीजेपी व जदयूचा मुकाबला केला पाहिजे असे एकीकडे म्हणतात मात्र दुसरीकडे इतर पक्षांना महत्त्व देत नाहीत, ही काँग्रेसची भूमिका दुर्दैवी असल्याची खंत पटेल यांनी यावेळी व्यक्त केली.8 / 11बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत एकत्र येणं शक्य नाही, आमच्या पक्षाची धेय्य आणि धोरणं वेगळी आहेत. त्यामुळे, आम्ही स्वतंत्रपणे बिहारची निवडणूक लढवणार आहोत. बिहारमधील पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांचीही स्वतंत्रपणे राष्ट्रवादीने निवडणूक लढवावी अशीच इच्छा असल्याचे खासदार पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.9 / 11राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत भोजपुरी सिनेअभिनेते सुदीप पांडे आणि दीपा पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 10 / 11बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी दिल्ली केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली असून मुख्य स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे असणार आहेत. 11 / 11 महाराष्ट्रात एकत्र असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी बिहारमध्ये स्वतंत्रपणे निवडणुका लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications