IT Raid : घरात मोठं घबाड, दुबईत कंपन्या, जाणून घ्या पियूष जैन कोण? By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 6:34 PM
1 / 8 कानपूरमधील अत्तर व्यावसायिक पीयूष जैन यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली असून, या धाडीमध्ये प्राप्तिकर विभागाला, नोटांनी भरलेली कपाटे सापडली आहेत. 2 / 8 या नोटांचे प्रमाण एवढे प्रचंड आहे की, गेल्या २४ तासांपासून येथील नोटांची मोजणी सुरू आहे. पीयूष जैन यांच्या घराबाहेर आतापर्यंन नोटांनी भरलेले सहा खोके ठेवण्यात आले आहेत. 3 / 8 नोटांनी भरलेले हे खोके प्राप्तिकर विभाग घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. घटनास्थळावर पीएसी बोलावण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत या धा्डीत तब्बल १५० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. 4 / 8 कन्नौजमधील अत्तर व्यावसायिक पीयूष जैन यांच्या कानपूर येथील घरी डीजीजीआय आणि प्राप्तिकर विभागाने गुरुवारी धाड टाकली होती. यादरम्यान, कपाटांमध्ये मोठ्या प्रमाणात नोटा असून पीयूष जैन यांच्या घरामध्ये नोटांच्या राशी लागल्या आहेत. 5 / 8 आयटी विभागाच्या या धाडीमुळे देशभरात पियूष जैन हे नाव चर्चेत आलं आहे. पियुष जैन कोण आहेत, त्यांचा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध आहे, हेही चर्चेत आहे. पियूष जैने हे अत्तर, परफ्यूम व्यापारी असून समाजवादी पक्षाचे निकटवर्तीय असल्याचे समजते. 6 / 8 अखिलेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत बरोबर 1 महिन्यापूर्वी पियूष जैन यांनी समाजवादी नावाने परफ्यूमचा ब्रँड लाँच केला होता. 2022 ची निवडणूक लक्षात घेऊन 22 फुलांनी हे अत्तर बनवलं होतं. गुरुवारी डीजीजीआयच्या पथकाने जैन यांच्या मुंबई, चेन्नई, गुजरात आणि कानपूर येथील घरावर छापेमारी केली. 7 / 8 पियूष जैन यांचं मूळ निवासस्थान कन्नौजच्या छपट्टी परिसरातील होली चौक हे आहे. देशातील मोठ्या अत्तर, परफ्यूम व्यापाऱ्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांच्या कंपनीतील अत्तर दुबई, सऊदी अरबमध्येही एक्सपोर्ट केलं जातं, तेथेही त्यांच्या कंपनी आहेत. 8 / 8 पियुष जैन यांच्याकडे 40 कंपन्या आहेत. कंपनी, कोल्ड स्टोअर, पेट्रोल पंप आणि कार्यालयावरही आज छापेमारी करण्यात आली आहे. त्यामध्ये, कोट्यवधींची करचोरी उघडकीस आली आहे. आणखी वाचा