It was decided that each MP's Loksabha seat system
अशी निश्चित होते प्रत्येक खासदाराची लोकसभेतील आसनव्यवस्था By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 5:50 PM1 / 7सतराव्या लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी होण्याची प्रतीक्षा आहे. नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर नव्या लोकसभेचे अधिवेशन आयोजित होईल. दरम्यान, लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी कुठे बसावे याची एक नियमावली आहे. या नियमावलीनुसारच प्रत्येक सभासद कुठे बसणार हे निश्चित होते. जाणून घेऊयात या नियमावली विषयी 2 / 7लोकसभेच्या सभागृहाचे सहा ब्लॉकमध्ये विभाग करण्यात आले आहेत. हे ब्लॉक सभापतींच्या आसनाच्या उजवीकडे आणि डावीकडे असतात. याच ब्लॉकमध्ये खासदारांची आसने असतात. तसेच मध्ये गॅलरी असते. प्रत्येक ब्लॉकमध्ये 11 ओळी असतात. त्यावर खासदारांचा आसनव्यवस्था असते. सभापतींच्या आसना खाली असलेल्या बेंचवर लोकसभेच्या महासचिवांसह सचिवालयातील अन्य अधिकारी बसतात. हे अधिकारी लोकसभेतील कारवाईचा रेकॉर्ड ठेवतात. 3 / 7लोकसभा सभापतींच्या उजव्या आणि डाव्या बाजूकडील दोन ब्लॉकमध्ये प्रत्येकी 97-97 आसने असतात. तर मधल्या चार ब्लॉकमध्ये प्रत्येकी 89 आसने असतात. प्रत्येक खासदारासाठी एक जागा निश्चित असते. मात्र कुणी मंत्री लोकसभेचा सदस्य नसेल तरी तो चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित राहू शकतो. 4 / 7लोकसभेचे सभापती कुठल्याही पक्षाच्या सदस्यांच्या संख्येच्या आधारावर त्यांच्या बसण्याची जागा निश्चित करतात. त्यासाठी एक फॉर्म्युला वापरला जातो. कुठलाही पक्ष किंवा आघाडीकडे असलेल्या एकूण जागांना लाइनमधील एकूण जागांच्या संख्येने गुणले जाते. त्यानंतर जी संख्या येते तिला लोकसभेतील एकूण सदस्यसंख्येमधून विभाजित केले जाते. 5 / 7यावेळी एनडीएला 353 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एनडीएला मिळालेल्या एकूण जागांना पहिल्या रांगेतील एकूण जागांनी गुणले आणि सभागृहातील एकूण संख्येमधून विभाजित केले तर 12.83 हे उत्तर येते. पूर्णांकामध्ये विचार केल्यास एनडीएच्या 13 खासदारांना यावेळी पहिल्या रांगेत स्थान मिळणार आहे. 6 / 7वरील फॉर्म्युला पाच किंवा त्यापेक्षा जास्त जागा असलेल्या पक्षांना लागू होतो. जर कुठल्याही पक्षाच्या सदस्यांची संख्या पाच पेक्षा कमी असेल तर सभापती आणि संबंधित पक्षाचे नेते परस्पर सहमतीने त्यांच्या बसण्याची जागा निश्चित करतात. कुठल्याही सदस्याचे ज्येष्ठत्व पाहून त्यांना पुढच्या रांगेत स्थान दिले जाते. सोळाव्या लोकसभेत मुलायम सिंह यादव आणि एच. डी. देवेगौडा यांना पहिल्या रांगेत स्थान दिले गेले होते. 7 / 7संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या लोकसभेची अधिकाधिक सदस्य संख्या ही 552 असू शकते. ज्यामध्ये 530 सदस्य विविध राज्यांमधून निवडून येतात. तर 20 सदस्य केंद्रशासित प्रदेशामधून निवडून येतात. तसेच राष्ट्रपती अँग्लो इंडियन समाजाच्या दोन व्यक्तींना लोकसभेवर नामांकित करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications