शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जय माता दी... राहुल गांधींनी 14 किमी पायी चालून घेतले वैष्णोदेवीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 10:11 AM

1 / 10
काँग्रेस नेते राहुल गांधी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे या दर्शनासाठी त्यांनी तब्बल 14 किमीचा पायी प्रवास केला आहे. सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात ते चालत होते.
2 / 10
राहुल गांधी दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर असून गुरुवारी ते पायी चालत वैष्णोदेवी मंदिरात पोहोचले. काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
3 / 10
त्यामध्ये राहुल गांधी वैष्णोदेवीच्या दिशेने चालताना दिसत आहेत. तोंडाला मास्क आणि चालतानाची स्पीड, भोवताली सुरक्षारक्षकांचा कडक पहारादेखील होता.
4 / 10
राहुल गांधींच्या स्वागतासाठी दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्ते हातामध्ये पक्षाचा झेंडा घेऊन उभे असल्याचं दिसत आहे. प्रसारमाध्यमंदेखील यावेळी राहुल गांधींचा पाठलाग करत होती.
5 / 10
राहुल गांधी यांनी यावेळी आपण कोणतंही राजकीय भाष्य करणार नसल्याचं सांगितलं. “मी येथे देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि प्रार्थनेसाठी आलो आहे. मला कोणतंही राजकीय भाष्य करायचं नाहीये,” असं राहुल म्हणाले.
6 / 10
राहुल गांधी यांना गेल्या अनेक वर्षांपासून वैष्णोदेवीला भेट द्यायची होती अशी माहिती काँग्रेसचे जम्मू काश्मीरमधील प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर यांनी दिली.
7 / 10
“आम्ही गेल्या तीन वर्षांपासून राहुल गांधींना विचारणा करत होतो. त्यांनाही यायचं होतं, पण राजकीय परिस्थिती अशी होती की ते दौरा करु शकत नव्हते,” असे गुलाम अहमद मीर यांनी सांगितले
8 / 10
राहुल गांधींची वैष्णोदेवीला पायी चालत जाऊन आरतीमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती असंही त्यांनी सांगितलं. “दुसऱ्या दिवशी ते पुन्हा पायी चालत खाली उतरणार आहेत.
9 / 10
राहुल यांची वैष्णोदेवीवर भक्ती आहे, यामुळेच आम्ही दौऱ्याच्या पहिल्या दिवशी कोणताही राजकीय कार्यक्रम ठेवला नाही,” अशी माहितीही त्यांनी दिली. राहुल गांधींचे मंदिरातील प्रमुख पुजाऱ्यांनी स्वागत केले.
10 / 10
जम्मू काश्मीरनंतर राहुल गांधी लडाखचा दौरा करणार आहेत. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्यानंतर राहुल गांधींचा हा दुसरा दौरा आहे.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेस