शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jammu Kashmir: काश्मीरबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?; अमित शाहांनी जबाबदारी घेतली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 1:48 PM

1 / 10
काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा क्रूर चेहरा समोर येत आहे. गैरमुस्लीम, परप्रांतीय आणि काश्मीर पंडितांना दहशतवाद्यांनी निशाणा बनवलं आहे. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांत सातत्याने दिवसाढवळ्या दहशत पसरली आहे.
2 / 10
आतापर्यंत 3 हिंदूंची हत्या केल्यानं खळबळ माजली आहे. त्यामुळे पुन्हा काश्मीरात १९९० च्या दशकासारखा दहशतवाद उफाळून आलाय का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारवर लोकांच्या सुरक्षेसाठी विरोधकांचा दबाव वाढत चालला आहे.
3 / 10
दुसरीकडे सरकार सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी नियोजन आखण्यास सज्ज झाली आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी जम्मू काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी स्वत:च्या हाती घेतली आहे.
4 / 10
गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी जम्मू काश्मीरच्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. दहशतवाद्यांकडून काश्मीर खोऱ्यात टार्गेट किलिंग होत आहे. गेल्या १५ दिवसांत ही दुसरी महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे.
5 / 10
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बैठकीत जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, केंद्र सरकार आणि राज्यातील वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. बैठकीत खोऱ्यातील सर्वसामन्यांच्या हत्येपासून अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा होणार आहे.
6 / 10
मागच्या बैठकीत गृहमंत्री शाह यांनी दहशतवाद विरोधी अभियानाचं कौतुक केले होते. त्याचसोबत सुरक्षा दलांना आणि केंद्र शासित प्रदेशांना सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबवण्याबाबत योग्य त्या कारवाया करण्याचे आदेश दिले होते.
7 / 10
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं समृद्ध आणि शांततामय जम्मू काश्मीरचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरक्षा दलाने सीमेवरील घुसखोरीवर आळा बसवायला हवा असं म्हटलं होतं.
8 / 10
यावेळच्या बैठकीत महत्त्वाचं म्हणजे काश्मीर खोऱ्यात सर्वसामान्यांच्या हत्येवर चर्चा होणार आहे. सध्या लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे सरकारनं ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
9 / 10
दहशतवादी कुठल्या ना कुठल्या मार्गाने लोकांची हत्या करत आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत जम्मू काश्मीरच्या परिस्थितीवर ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो असं बोललं जात आहे. काश्मीरात कलम ३७० हटवण्यासाठी सरकारने आधीच सुरक्षेची पाऊल उचलली होती.
10 / 10
काही दिवसांपूर्वी राहुल भट याची हत्या करण्यात आली. यानंतर गेल्या आठवड्यात काश्मीरी पंडीत असलेल्या शिक्षिकेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि आज सकाळी सकाळी बँका सुरु होताच दहशतवाद्यांनी कुलगामच्या एका बँकेच्या मॅनेजरवर हल्ला करून ठार केले आहे.
टॅग्स :Amit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीर