Janani Janmabhumishch Swargadapi Gariyasi; The President bowed as soon as he got off the helicopter
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी; हेलिकॉप्टरमधून उतरताच राष्ट्रपती नतमस्तक By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 2:16 PM1 / 11देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्थानकाहून कानपूरला रेल्वेने प्रवास केला. 2 / 11तब्बल १५ वर्षानंतर राष्ट्रपतीपदावरील व्यक्ती रेल्वेने प्रवास करत आहे. यापूर्वी २००६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी रेल्वेने प्रवास केला होता.3 / 11कानपूरमधील झिंझाक आणि कानपूर देहातच्या रुरा येथे ही ट्रेन थांबली असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. 4 / 11राष्ट्रपती कोविंद यांची जन्मभूमी असलेल्या या गावात आपल्या शालेय जीवनाच्या दिवसांमधील जुन्या परिचितांची भेट घेत आहेत. तसेच, संबंधित स्थळांनाही भेटी देत आहेत. 5 / 11राष्ट्रपतींचे जन्मस्थान असलेल्या कानपूर देहातच्या परौन्ख गावाजवळ हे दोन थांबे असून तेथे त्यांच्या सन्मानार्थ आज जून कार्यक्रम होत आहेत. 6 / 11राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते प्रथमच आपल्या जन्मस्थळी भेट देत आहेत. या ठिकाणी यापूर्वी भेट द्यायची त्यांची इच्छा होती, परंतु कोरोना महामारीमुळे ते शक्य झाले नाही.7 / 11आपल्या जन्मभूमीत हेलिकॉप्टरवरुन उतरताच राष्ट्रपतींनी जन्मभूमीला वाकून स्पर्श करत दर्शन घेतले. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत याच मातीनं देशसेवची शिकवण दिल्याचं ते म्हणाले. 8 / 11जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी म्हणजेच जन्म देणारी माऊली आणि जन्मभूमीचा गौरव हे स्वर्गाहूनही सुंदर, महान आहे, असेही कोविंद यांनी म्हटलं. 9 / 11देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी अनेकदा रेल्वे प्रवास केला होता. राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी बिहार दौऱ्यादरम्यान सिवान जिल्ह्यातील त्यांचे जन्मस्थान झिरादेई येथे रेल्वेनेच भेट दिली होती.10 / 11राष्ट्रपती कोविंद यांनी परौन्खा येथील मिलन केंद्रास भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच, वीरांगणा झालकरी महावद्यालयात संबोधितही केले. 11 / 11२८ जून रोजी राष्ट्रपती कानपूर स्थानकातून रेल्वेगाडीतून लखनौला दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जातील. २९ जून रोजी ते विशेष विमानाने नवी दिल्लीला परतणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications