Jaya Kishori Networth: कथा सांगण्यासाठी किती पैसे घेतात जया किशोरी? नेटवर्थ जाणून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 19:57 IST
1 / 11कथाकार आणि मोटिव्हेशनल स्पिकर जया किशोरी यांचे फॉलोअर्स केवळ भारतातच नाही, तर परदेशातही आहेत. अगदी सोशल मीडियावरही त्यांचे लक्षावधी फॉलोअर्स आहेत. त्या श्रीमद्भागवताचे कथा वाचन करतात. त्यांची कथा ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक येत असतात. 2 / 11जया किशोरी यांचे लाईफ मॅनॅजमेन्ट आणि मोटिवेशनल व्हिडिओजदेखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. महत्वाचे म्हणजे, जया किशोरी यांच्या कथेचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर त्या किती फीस घेतात, हे जाणून घेण्याची उत्सुकताही अनेक वेळा अनेकांना असते. तर जाणून घेऊयात यासंदर्भात3 / 11जया किशोरी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. तर वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षीच त्यांनी अध्यात्माच्या वाटेवर चालण्यास सुरुवात केली होती.4 / 11त्या जेव्हा 9 वर्षांच्या झाल्या, तेव्हा त्यांनी संस्कृत भाषेतून शिव तांडव स्तोत्र, रामाष्ठ्कम, लिंगाष्ठ्कम आणि इतरही काही स्तोत्रांचे पठण करायला सुरुवात केली होती.5 / 11जया किशोरी लहान असताना त्यांची डान्सर होण्याची इच्छा होती. मात्र, ती कुटुंबाला हे पसंत नव्हते. यामुळे त्यांनी डान्सर होण्याचे स्वप्न सोडले आणि मग भगवान श्रीकृष्ण यांच्या भक्तीचा मार्ग निवडला.6 / 11जया किशोरी यांचा जन्म 13 जुलै 1995 रोजी प.बंगालमधील कोलकात्यात एका गौड ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव जया शर्मा असे आहे. त्यांच्या आईचे नाव सोनिया शर्मा आणि वडिलांचे नाव शिवशंकर शर्मा असे आहे. त्यांना एक छोटी बहिणही आहे. तिचे नाव चेतना शर्मा असे आहे.7 / 11जया किशोरी यांना किशोरी ही पदवी त्यांच्या गुरुंनी दिली आहे. त्या स्वर्गीय गुरु श्री रामसुखदासजी महाराज आणि भगवद आचार्य विनोद कुमारजी सहल यांना गुरु मानतात.8 / 11जया किशोरी या जेव्हा भजन गातात तेव्हा श्रोते मंत्रगुग्ध होऊन जातात. माध्यमांतील वृत्तांनुसार, जया किशोरी या श्रीमद्भागवत कथेच्या कार्यक्रमासाठी 9 लाख 50 हजार रुपये एवढी फीस घेतात.9 / 11या फीसचा जवळपास अर्धा हिस्सा म्हणजेच 4 लाख 25 हजार रुपये कथेपूर्वी घेतात आणि उरलेली फीस कथा झाल्यानंतर घेतात. वृत्तांनुसार, त्यांच्या फीसचा एक मोठा हिस्सा नारायण सेवा संस्थेसाठी दान करण्यात येतो. ही संस्था दिव्यांगांच्य सेवेसह त्यांना आर्थिक सहकार्यही करते.10 / 11जया किशोरी यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते, की कथावाचन आणि सेमिनारमध्ये बिझी असल्याने त्या स्वतः दिव्यांगांची सेवा करू शकत नाही. यामुळे दान आणि इतर मार्गाने त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करते.11 / 11याशिवाय जया किशोरी यूट्यूब व्हिडिओज, अल्बम्स आणि मोटिवेशनल स्पीचच्या माध्यमानेही कमाई करते. माध्यमांतील वृत्तांनुसार जया किशोरी यांची नेटवर्थ 1.5 ते 2 कोटी रुपये एवढी आहे