शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महेश बाबूच्या पडद्यावरील 'आई'चा भाजपात प्रवेश; प्रसिद्ध अभिनेत्रीनं हाती घेतलं कमळ

By ओमकार संकपाळ | Published: August 02, 2023 11:28 PM

1 / 10
भाजपामध्ये साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने प्रवेश केल्याने तेलंगाणात पक्षाची ताकद वाढली आहे. जयासुधा या साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असून त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
2 / 10
प्रामुख्याने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलेल्या जयासुधा यांनी आपल्या अप्रतिम अभिनयशैलीने चाहत्यांच्या मनात जागा केली. त्यांनी मल्याळम, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
3 / 10
अभिनेते विजयसोबतचा त्यांचा नुकताच वारिसू हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये जयासुधा यांच्याशिवाय प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना देखील मुख्य भूमिकेत होती.
4 / 10
भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी जयासुधा यांनी २००९ मध्ये काँग्रेस पक्षाकडून सिकंदराबाद विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षात प्रवेश केला, परंतु निवडणुकीत पराभव झाला.
5 / 10
खरं तर जयासुधा भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा वर्षभरापासून सुरू होती. भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री एटाळा राजेंद्र यांनी त्यांना पक्षात येण्यासाठी मनवले असल्याचे बोलले जाते. पण, जयासुधा यांनी काही अटी ठेवल्या आहेत.
6 / 10
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना तिकिट देण्याचे आश्वासन दिल्याचे कळते. बहुधा त्या पुन्हा एकदा सिकंदराबादमधूनच निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी २००९-२०१४ या कालावधीत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
7 / 10
दरम्यान, अभिनय अन् राजकारण दोन्हीही व्यासपीठांवर जयासुधा यांनी आपला ठसा उमटवला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांनी १९७० आणि १९८० च्या दशकात तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
8 / 10
आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्या सांगण्यावरून जयासुधा यांनी २००९ मध्ये राजकीय खेळी सुरू केली. त्याच वर्षी त्यांनी सिकंदराबाद विधानसभा मतदारसंघातून काँग्रेससाठी निवडणूक जिंकली होती.
9 / 10
जयासुधा यांनी शेकडो तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. अभिनेता महेश बाबू, अल्लू अर्जुन, रामचरण तेजा, विजय अशा अनेक साऊथ अभिनेत्यांच्या आईच्या भूमिकेत देखील त्या दिसल्या आहेत.
10 / 10
जयासुधा यांनी शेकडो तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. अभिनेता महेश बाबू, अल्लू अर्जुन, रामचरण तेजा, विजय अशा अनेक साऊथ अभिनेत्यांच्या आईच्या भूमिकेत देखील त्या दिसल्या आहेत.
टॅग्स :BJPभाजपाTelanganaतेलंगणाMahesh Babuमहेश बाबूPoliticsराजकारण