JOB Alert india post gds maharahstra recruitment 2021 apply for gramin dak sewak vacancy
JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! दहावी पास असणाऱ्यांसाठी टपाल विभागात बंपर भरती, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 2:44 PM1 / 14नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. दहावी पास तरुणांना पोस्टात (India Post Office) नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. भारतीय पोस्ट विभागाने महाराष्ट्र सर्कलसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. 2 / 14पोस्टाने वेबसाईटवर जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांवर भरती होणार आहे. ग्रामीण डाक सेवक आणि ब्रँच पोस्ट मॅनेजर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 3 / 14दहावी पास तरुण यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्राप्त झाल्यानंतर दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवलं जाईल. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. 4 / 14ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांच्या 2428 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.5 / 14या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. दहावीमध्ये गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषयात पास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 6 / 14या पदांवर भरती होण्यासाठी वय 18 ते 40 वर्षे असले पाहिजे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट असेल. 7 / 14एससी आणि एसटीसाठी 5 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमदेवारांसाठी 3 वर्ष वाढवून दिली जातील. अर्जाची फी 100 रुपये आकारण्यात येईल.8 / 14भारतीय पोस्टाकडून जारी करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार https://appost.in/gdsonline/ या वेबसाईटवर 27 एप्रिल ते 26 मे या दरम्यान अर्ज करता येईल. 9 / 14उमेदवार पोस्टाच्या पोर्टलवर एकदा नोंदणी करु शकेल. नोंदणी क्रमांकाद्वारे विविध सर्कलमधील भरतीसाठी अर्ज करू शकतो.10 / 14ब्रांच पोस्ट मास्टर पदासाठी 12000 ते 14,500 रुपये, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक यांना 10000 ते 12000 रुपये पगार मिळेल.11 / 14टपाल विभागाच्या भर्ती पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या अद्ययावत माहितीनुसार अर्ज, नोंदणी फी, अर्ज भरणे आणि अर्ज सादर करणे या तीन टप्प्यात अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाईल.12 / 14उमेदवारांनी प्रथम नोंदणीच्या लिंकवर क्लिक करून संबंधित पृष्ठावर जाणे आवश्यक आहे आणि त्यानंतर आवश्यक तपशील भरल्यानंतर उमेदवारांना त्यांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात सक्षम होईल. 13 / 14उमेदवारांनी अर्ज फी ऑनलाईन भरावी लागेल. फी भरल्यानंतर उमेदवार ऑनलाईन लिंकवर अॅप्लिकेशन ऑनलाईन लिंक वर क्लिक करुन अर्ज सबमिशन पृष्ठावर जाऊ शकतात आणि आवश्यक तपशील भरल्यानंतर उमेदवारांना अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येईल.14 / 14नोकरीसाठी इच्छूक असलेले उमेदवार appost.in किंवा appost.in/gdsonline या ठिकाणी अधिक माहिती मिळवू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications