job opportunities now in RBI; Also extended the deadline
बँका सोडा...आता थेट आरबीआयमध्येच नोकरीची संधी; मुदतही वाढविली By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 4:44 PM1 / 8देशातील सर्वात मोठी स्टेट बँक असो किंवा गावातील पतसंस्था, यांच्यावर एकच शिखर बँक नियंत्रण ठेवते. ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याच बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आली आहे. 2 / 8महत्वाचे म्हणजे ही भरती सहाय्यक पदांसाठी आहे. आरबीआयने ऑनलाईन अर्जाची मुदत 20 जानेवारीपर्यंत वाढविली आहे. 3 / 8ही भरती आरबीआयच्या विविध कार्यालयांसाठी करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 4 / 8उमेदवारांची कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील कमीतकमी 50 टक्के उत्तीर्ण असलेली पदवी असणे बंधनकारक आहे. 5 / 8पदाचे नाव सहाय्यक, पदांची संख्या 926 आहे. अर्जदाराचे वय 20 वर्षे आणि जास्तीतजास्त 28 वर्षे आहे. 6 / 8खुला, ईडब्ल्यूएस आणि ओबीसींसाठी 450 रुपये आणि एससी, एसटी, पीडब्लूडी यांच्यासाठी 50 रुपये शुल्क आहे. 7 / 8उमेदवाराची निवड ऑनलाईन पूर्व परीक्षा, ऑनलाइन मुख्य परीक्षा आणि भाषेतील प्राविण्य पाहून केली जाणार आहे. 8 / 8https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/ADVTRPS231220191CA99C7B271B4474ABB2A6813C5B3850.PDF आणखी वाचा Subscribe to Notifications