शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rahul Gandhi: कदमो से कदम मिलते है; बॉलिवूड अभिनेत्री राहुल गांधींच्या यात्रेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 12:45 PM

1 / 10
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आदी दिग्गज या यात्रेत सहभागी होणार आहेत.
2 / 10
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राहुल गांधीच्या महाराष्ट्रातील दौऱ्याबाबत मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. त्यामुळे राहुल गांधीच्या यात्रेची आता महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे.
3 / 10
राहुल गांधींनी तेलंगणातील हैदराबाद येथे मंगळवारी यात्रेतून स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी, वडिलांच्या आठवणी जागवल्या, तर हैदराबादेत रोहित वेमुलाच्या आईचीही मायेनं भेट घेतली. राहुल गांधीच्या या यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
4 / 10
हैदराबादमध्ये आज यात्रेत राहुल गांधीसमवेत बॉलिवूड अभिनेत्री आणि दिग्दर्शक पूज भट्ट यांनीही सहभाग घेतल्याचे दिसून आले. पूज भट्ट यांनी राहुल गांधींसमवेत कदमो मिलते है कदम... अशा रितीने पायी प्रवासही केला. बालागनर मेन रोड येथे ही यात्रा चालत होती.
5 / 10
भारत जोडो यात्रेत थेट सहभागी होणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री म्हणून पूजा भट्ट ह्या पहिल्याच आहेत. त्यामुळे, यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांचाही जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी, अनेकांनी नारेबाजीही केली.
6 / 10
पूजा भट्ट या सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध मुद्द्यांवर आवाज उठवत असून आता थेट काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याने चांगलीच चर्चा होत आहे.
7 / 10
पूजा भट्ट या दिग्दर्शक महेश भट्ट यांची कन्या असून सडक, दिल है की मानता नही, जख्म या चित्रपटांत प्रमुख भूमिका निभावली आहे. सन १९८९ मध्ये डॅडी या चित्रपटातून पूजा यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
8 / 10
राहुल गांधींनी हैदराबादच्या चारमिनार येथे तिरंगा फडकावला. यावेळी, वडिलांच्या सद्भावना यात्रेची आठवणही सांगितली. ३२ वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी चारमिनार येथून सद्भभावना यात्रेची सुरुवात केली होती.
9 / 10
भारताची एकता आणि अखंडतेसाठी त्यांनी जीवाचं बलिदान दिलं. सद्भावना मानवतेचा सर्वात अनुपम मुल्य आहे. मी या मुल्याला तुटू देणार नाही, असेही राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
10 / 10
दरम्यान, राहुल गांधींनी तेलंगणातील हैदराबाद येथे मंगळवारी यात्रेतून स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी, वडिलांच्या आठवणी जागवल्या, तर हैदराबादेत रोहित वेमुलाच्या आईचीही मायेनं भेट घेतली.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीbollywoodबॉलिवूडhyderabad-pcहैदराबादcongressकाँग्रेस