शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अध्यात्मिक पर्यटनाचं लय भारी ठिकाण, अवश्य भेट द्या 'कैची धाम'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 6:56 PM

1 / 10
धार्मिक पर्यटनासाठी कैंची धाम आश्रम हेही भक्त आणि श्रद्धाळूंसाठी अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. प्रसिद्ध संत नीम करोली बाबा यांनी याठिकाणी एक आश्रम स्थापित केला आहे.
2 / 10
कैंची धाम येथील आश्रम शांत आणि भक्तांच पर्यटनस्थळ बनलं आहे. आत्मिक समाधानासाठी आणि शांतीसाठी भक्तगण येथे गर्दी करतात. उत्तराखंडच्या निसर्गसुंदर डोंगरात हे ठिकाण वसलंय.
3 / 10
गतवर्षी क्रिकेट जगतातील काही सेलिब्रिटी आणि मनोरंजन जगतातील काही दिग्गजही, तसेच उद्योग जगतातील नामवंतही नीम करोली बाबांच्या आश्रमात आले होते.
4 / 10
नीम करोली बाबांच्या या आश्रमात तुम्हालाही जायचं असेल तर, कैची धामच्या संपूर्ण पर्यटन यात्रेची माहिती ठेवायला हवी.
5 / 10
कैची धाम हे उत्तराखंडच्या नैनीताल शहरापासून १७ किमी दूर अंतरावर आहे. रस्ते मार्गाने आपण येथे सहज पोहोचू शकता. राजधानी दिल्लीहून नैनीताल ३२४ किमी दूर आहे.
6 / 10
दिल्लीहून नैनीतालपर्यंत पोहोण्यासाठी ६ तासांचा अवधी लागतो, तर तिथून पुढील प्रवासही तुम्हाला रस्ते मार्गाने बायकार करता येईल.
7 / 10
तुम्ही विमान प्रवास करू इच्छित असाल तर, कैची धामपासून ७० किमी दूरवर विमानतळ आहे. येथे पोहोचण्यासाठी टॅक्सी किंवा बस मिळू शकते.
8 / 10
रेल्वे प्रवासासाठी जवळच काठगोदाम हे रेल्वे स्टेशन आहे. काठगोदाम रेल्वे स्थानकापासून केवळ ३८ किमी अंतरावर नीम करोली आश्रम आहे.
9 / 10
नीम करोली बाबांच्या आश्रमात म्हणजेच कैची धामला जाण्यासाठी उन्हाळ्यातील दिवस उत्तम पर्यटन वेळ ठरू शकेल. म्हणून, मार्च ते जून महिन्यापर्यंत तुम्ही येथे पर्यटनास जाऊ शकता.
10 / 10
उन्हाळ्यानंतर हिवाळ्यात म्हणजे पावसाळा संपल्यानंतरही येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे, सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यातही तुम्ही कैची धामला भेट देऊन पर्यटन आणि आत्मिक समाधान मिळवू शकता.
टॅग्स :tourismपर्यटनUttarakhandउत्तराखंडnainital-udhamsingh-nagar-pcनैनीताल-उधमसिंह नगर