कर्नाटकात 1 नोव्हेंबरच्या दिवशी साजरा करण्यात येणारा कन्नड राज्योत्सव उत्साहात संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 21:43 IST
1 / 5कर्नाटकात 1 नोव्हेंबरच्या दिवशी कन्नड राज्योत्सव साजरा केला जातो. 2 / 5 1956मध्ये याच दिवशी दक्षिण भारतातील कन्नड बोलणा-या प्रदेशांना एकत्र करून कर्नाटक राज्याची निर्मिती करण्यात आली होती. 3 / 5राज्यातील सर्व शाळांनी कन्नड भाषा शिकवली पाहिजे, असं प्रतिपादनही यावेळी सिद्धरामय्या यांनी केलं आहे. 4 / 5या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कर्नाटकात झालेल्या या कार्यक्रमात सांस्कृतिक नृत्याविष्काराची रेलचेल होती. 5 / 5बंगळुरुमधील कांतीरवा स्टेडिअममध्ये 62व्या कर्नाटका राज्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.