शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फेब्रुवारी महिन्यात 'पिक'वर असेल Omicron, पण...; कानपूर IIT प्राध्यापकांनी सांगितली दिलासादायक बाब

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2022 8:20 AM

1 / 9
देशात आता डेल्टा विषाणूची जागा ओमायक्रॉन संसर्गाने घेण्यास सुरुवात झाली आहे. विदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांपैकी ८० टक्के लोक हे ओमायक्रॉनचे बाधित असतात. मात्र, नव्या विषाणूच्या काही रुग्णांमध्ये संसर्गाची सौम्य लक्षणे आढळून आल्याचं समोर आलंय.
2 / 9
कोरोना चाचण्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेली घट चांगली नाही, असा इशारा केंद्र सरकारने १९ राज्यांना नुकताच दिला होता. ओमायक्रॉनमुळे संसर्गाचे प्रमाण खूपच वाढणार आहे, याकडेही केंद्राने लक्ष वेधले होते.
3 / 9
कोरोनातून बरे झालेल्या तसेच फायझरच्या लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांच्या शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीजना ओमायक्रॉन दाद देत नसल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. जगभरात सध्या वापरात असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसींचा प्रभाव नव्या विषाणूमुळे कमी होईल असे म्हटले जात होते, त्याचे प्रत्यंतर आता येत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
4 / 9
दरम्यान, देशात ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बोलताना आयआयटी कानपूरचे सीनिअर प्राध्यापक मणींद्र अग्रवाल यांनी दिलासा देणारी गोष्टी सांगितली आहे. ओमायक्रॉन फेब्रुवारी महिन्यात पिक वर असेल, परंतु रुग्णांची संख्या अधिक नसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
5 / 9
फेब्रुवारी महिन्यात ओमिक्रॉन व्हेरिअंटचा पीक असेल. परंतु रुग्णांची संख्या अधिक नसेल, तसंच रुग्णांना रुग्णालयातही दाखल व्हावं लागणाक नाही. फेब्रुवारी महिन्यानंतर हळूहळू ओमिक्रॉनची लाट कमी होऊ लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
6 / 9
गणितीय मॉडेलच्या आधारावर दक्षिण आफ्रिका आणि भारत यांची तुलना केल्यानंतर ते म्हणाले, दोन्ही देशांची नॅचरल इम्युनिटी एकसारखीच आहे. त्या ठिकाणी १७ डिसेंबरला ओमायक्रॉन पिकवर होता. आता त्या ठिकाणी रुग्णांची संख्या झपाट्यानं कमी होत आहे.
7 / 9
दक्षिण आफ्रिकेत नॅचरल इम्युनिटी जवळपास ८० टक्के आहे. याच्याचा अग्रवाल म्हणाले की दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच भारतातही ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढेल. परंतु त्यापैकी बहुतांश लोकांना रुग्णालयात दाखल व्हावं लागणार नाही. युरोपमध्ये इम्युनिटी कमी आहे, त्यामुळेच केसेस वाढत आहेत.
8 / 9
पाच राज्यांत होणाऱ्या आगामी निवडणुकांदरम्यान रुग्णसंख्या वाढू शकते का यावरही त्यांनी भाष्य केलं. निवडणुकांबाबत मला अधिक माहिती नाही. परंतु इतकं सांगू शकतो की दुसर्या लाटेदरम्यान डेल्टाच्या वेळी पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या. परंतु त्याचा अधिक परिणाम दिसून आला नाही. तिसऱ्या लाटेचा पिक फेब्रुवारीत असेल हे पाहून निवडणुका घेण्याचा किंवा टाळण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घ्यायला हवा असंही ते म्हणाले.
9 / 9
प्राध्यापक अग्रवाल यांनी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान केलेली भविष्यवाणीही अगदी योग्य ठरली होती. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणाहून दूर राहावं आणि मास्कचा वापर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनIndiaभारत