शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kanyadaan: ‘मी दानाची वस्तू नाही, तुमची मुलगी आहे’, IAS तरुणीने लग्नावेळी नाकारले कन्यादान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 9:50 AM

1 / 6
मध्य प्रदेशमधील नरसिंगपूर जिल्ह्यातील जोबा गावामध्ये एक महिला आयएएस अधिकारी आणि आयएफएस अधिकाऱ्याच्या झालेल्या लग्नाची चर्चा सध्या सुरू आहे. आयएएस तपस्या परिहार यांचा विवाह आयएफएस अधिकारी गर्वित गंगवार यांच्याशी झाला.
2 / 6
दरम्यान, हा विवाह ज्या कारणासाठी चर्चेत आहे ते कारण म्हणजे तपस्या परिहार यांनी आपले कन्यादान करण्यास दिलेला नकार होय. तपस्या यांनी त्यांच्या वडिलांना सांगितले की, मी दानाची वस्तू नाही. मी तुमची मुलगी आहे. असे सांगत त्यांनी स्वत:चे कन्यादान करण्यास नकार दिला.
3 / 6
हिंदू संस्कृतीमध्ये कन्यादानाला विशेष महत्त्व आहे. मात्र तपस्या परिहार यांनी सर्व बंधने तोडत लग्नामध्ये कन्यादानाचा विधी होऊ दिला नाही. त्यामुळे हे लग्न चर्चेत आहे.
4 / 6
याबाबत तपस्या परिहार यांनी सांगितले की, लहानपणापासून माझ्या मनात समाजाच्या या विचारसरणीबाबत विचार यायचे की कसं कुणी माझे माझ्या इच्छेविरुद्ध कन्यादान करू शकते. याबाबत मी हळूहळू माझ्या कुटुंबीयांशी चर्चा केली. अखेर माझ्या कुटुंबीयांनी माझ्याशी सहमती दर्शवली. तसेच नंतर यासाठी वर पक्षाला राजी केले गेले. अखेर कन्यादानाशिवाय विवाह सोहळा संपन्न झाला.
5 / 6
याबाबत तपस्याच्या पतीने सांगितले की, कुठल्याही मुलीला लग्नानंतर पूर्णपणे बदलावे लागते. मग डोक्यावर कुंकू लावायचा असो वा कुठली अन्य परंपरा ज्यामधून ती तरुणी विवाहीत आहे हे सिद्ध होईल. असे विधी मुलांसाठी कधी लागू होत नाहीत. त्यामुळे अशा प्रधा आपण हळुहळू बंद केल्या पाहिजेत.
6 / 6
हा विवाह सोहळा वैदिक मंत्रोच्चारासह संपन्न झाला. केवळ कन्यादानाचा विधी झाला नाही. त्यामुळे हा विवाहसोहळा आगळावेगळा ठरला.
टॅग्स :marriageलग्नMadhya Pradeshमध्य प्रदेश