शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kargil Vijay Diwas : भारतानं 'ऑपरेशन विजय' राबवलं अन् पाकचं 'ऑपरेशन बद्र' हाणून पाडलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 2:51 PM

1 / 9
कारगिलच्या रणभूमीवर लढल्या गेलेल्या युद्धाला आज २१ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने देशभरात शहीद जवानांना मानवंदना देण्यात येत आहे. तसेच, यानिमित्ताने देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
2 / 9
भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारील देशांमधील छत्तीसचा आकडा जगजाहीर आहे. तसेच, नियंत्रण रेषेवर नापाक कारवाया करणं यामुळे भारत-पाकमधील तणाव वाढतच चाललाय. त्याच पार्श्वभूमीवर 'पाकला पुन्हा एकदा कारगिलसारखा दणका द्यायला हवा', अशी इच्छा अनेक जण व्यक्त करतात.
3 / 9
कारगिल विजय दिवसाच्या (२६ जुलै) निमित्तानं या युद्धाचा इतिहास आणि कारणं वेगवेगळी आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये १९७२ मध्ये झालेलं दुसरं युद्धही भारतानं जिंकलं होतं. पण दोनदा हिसका दाखवूनही पाकिस्तानचं शेपूट वाकडंच आहे.
4 / 9
१९९९ मध्ये झालेल्या या युद्धात भारतीय जवानांनी पराक्रमांची शर्थ करत पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांना हुसकावून लावत विजय मिळवला होता. जम्मू-काश्मीरमधील कारगिल, द्रास आणि बटालिक या विभागात लढल्या गेलेल्या या युद्धात भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय मोहीम राबून शत्रूला सळो की पळो करून सोडले होते.
5 / 9
भारतीय लष्कराच्या जिगरबाज जवानांनी आतापर्यंत त्यांचे सगळे कट उधळून लावलेत. त्यापैकी सगळ्यात मोठा कट होता, तो म्हणजे 'ऑपरेशन बद्र'.
6 / 9
अणुचाचणीच्या मुद्द्यावरून भारत-पाकमधील संबंध टोकाला गेले होते. हे वातावरण निवळावं, सीमांवर शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून दोन्ही देशांनी फेब्रुवारी 1999मध्ये लाहोर इथे करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
7 / 9
लष्कराच्या आणि निमलष्करी दलाच्या सैनिकांना आणि त्यांच्या आडून दहशतवाद्यांना लपूनछपून नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यास त्यांनी सुरुवात केली. हेच होतं, 'ऑपरेशन बद्र'.
8 / 9
काश्मीर आणि लडाखला जोडणारा मार्ग तोडून भारतीय जवानांना सियाचीनमधून हटवण्याचं कारस्थान त्यांनी रचलं होतं. कारण या भागात तणाव निर्माण झाल्यास काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल आणि भारतावर दबाव वाढवता येईल, असं पाकिस्तान समजत होता.
9 / 9
युद्धात २६ जुलै १९९९ च्या दिवशी शेवटचा पाकिस्तानी सैनिक मारला गेला आणि भारतीय जवानांनी कारगिलवर अभिमानानं तिरंगा फडकवला. भारतीय लष्कराचे ५४३ अधिकारी आणि जवान या युद्धात शहीद झाले.
टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनPakistanपाकिस्तानIndiaभारत