kargil war hero Mejor D. P. Singh completes skydive
कारगिल युद्धात पाय गमावलेला जिगरबाज जवान बनला स्काय डायवर By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 12:56 PM1 / 7कधीही हार न मानण्याची वृत्ती बाळगणारे कारगिल युद्धातील हीरो मेजर डी. पी. सिंह यांचे संपूर्ण जीवन देशाला समर्पित राहिले आहे. 2 / 7कारगिल युद्धात पाय गमावल्यानंतरही मेजर डी. पी. सिंह यांनी जिगरबाज वृत्ती दाखवत कृत्रिम पायासह रनिंग ट्रॅकवर पाऊल ठेवले आणि ब्लेड रनर म्हणून मान मिळवला. आता त्यांनी स्काय डायव्हिंगचे कौशल्या आत्मसात करून आकाशातून झेप घेण्याचा पराक्रमही केला आहे. 3 / 7नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पिरिट ऑफ अॅव्हेंचर कार्यक्रमामध्ये मेजर डी. पी. सिंह यांनी स्काय डायव्हिंग करत आकाशाची सफर केली. 4 / 7स्पिरिट ऑफ अॅव्हेंचर कार्यक्रमांतर्गत अपंगत्व आलेल्या जवानांना स्काय डायव्हिंगचे कौशल्य शिकवण्यात आले. दरम्यान, लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या परवानगीनंतर मेजर डी. पी. सिंह यांना स्काय डायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्यांनी आकाशातून यशस्वीपणे झेप घेत सर्वांसाठी अजून एक प्रेरणादायी आध्याय लिहिला. 5 / 7मेजर डी. पी. सिंह यांना आकाशातून झेप घेतली तेव्हाचा क्षण 6 / 7कारगिल युद्धादरम्यान 15 जुलै 1999 रोजी झालेल्या घनघोर लढाईवेळी पराक्रमांची शर्थ करताना मेजर डी. पी. सिंह गंभीर जखमी झाले होते. डॉक्टरांनी तर त्यांना मृत घोषित केले होते. मात्र नंतर त्यांच्या हृदयाची धडधड पुन्हा सुरू झाली. पण त्यांना आपला एक पाय गमवावा लागला होता. 7 / 72009 मध्ये मेजर डी. पी. सिंह यांनी कृत्रिम पायाच्या सहाय्याने चालणे अवगत केले. त्यानंतर सराव वाढवत त्यांनी रनिंग ट्रॅकवर पाऊल ठेवले. तसेच ते भारताचे पहिले मॅरेथॉन ब्लेड रनर बनले. सलग तीन मॅरॅथॉनमध्ये धावण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. तसेच त्यांच्या नावाचा दोन वेळा लिम्का बुकमध्येही समावेश करण्यात आलेला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications