शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Karnataka Assembly Election: कर्नाटकचं राजकारण, असं आहे २२४ जागांचं समीकरण, कोण ठरणार वरचढ? भाजपा, काँग्रेस की..., पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 3:22 PM

1 / 9
कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. निवडणूक आयोगाकडून औपचारिक घोषणा झाली नसली तरी सत्ताधारी भाजपा आण विरोधी पक्षातील काँग्रेस, जेडीएस सह सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. एकीकडे भाजपा आपली सत्ता कायम राखण्यासाटी प्रयत्नशील आहे. तर काँग्रेस दक्षिणेतील हे महत्त्वाचं राज्य सर करण्यासाठी कंबर कसून तयार आहे. तर कर्नाटकच्या राजकारणातील तिसरा ध्रुव असलेला जेडीएस २०१८ प्रमाणे किंगमेकर बनण्यासाठी प्रयत्नशील आहे.
2 / 9
विधानसभेच्या २२४ जागा असलेल्या कर्नाटकमधील राजकीय समीकरणं तेथील प्रत्येक विभागानुसार वेगळी आहे. त्यामुळे तिथे नेमकं कोण बाजी मारणार, याचा अंदाज सहजासहजी लावता येत नाही. कर्नाटकला भौगोलिकदृष्ट्या सहा भागात विभाजित करून तेथील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेता येतो. कारण प्रत्येक भागातील समीकरणं ही वेगवेगळी आहेत.
3 / 9
येथील आंध्र प्रदेशला लागून असलेल्या भागाला हैदराबाद कर्नाटक म्हटले जाते. तर महाराष्ट्राला लागून असलेल्या भागाला मुंबई कर्नाटक म्हटलं जातं. हैदराबाद कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 40 जागा आहेत. तर मुंबई कर्नाटक भागामध्ये विधानसभेच्या ४४ जागा आहेत. किनारी भागात १९ जागा आहेत. तर ओल्ड म्हैसूर भागात सर्वाधिक ६६ जागा आहेत. सेंट्रल कर्नाटकमध्ये २७ आणि बंगळुरू क्षेत्रात २८ जागा आहेत. अशा परिस्थितीत या सर्व भागातील राजकीय मूड काय आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
4 / 9
कर्नाटकचा किनारी भाग हा भाजपाच्या राजकारणाची प्रयोगशाळा मानला जातो. या भागावर भाजपाची भक्कम पकड आहे. खूप प्रयत्नांनंतरही काँग्रेसला भाजपाचा हा गड भेदला आलेला नाही. २०१३ मध्ये येडियुरप्पांच्या बंडखोरीमुळे येथे काँग्रेसने बाजी मारली होती. मात्र २०१८ मध्ये भाजपाने पुन्हा एकदा वर्चस्व मिळवले. येथे विधानसभेच्या १९ जागा आहेत. येथील राजकारण हे हिंदुत्वाच्या अवतीभवती फिरते. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपाचा हिंदुत्वाच्या पिचवरच येथे आपला अजेंडा सेट करत आहेत.
5 / 9
कर्नाटकमधील ओल्ड म्हैसूर हा भागा वोक्कालिगा जातीचा बालेकिल्ला आहे. ही जेडीएसची पारंपरिक व्होटबँक आहे. या भागात वोक्कालिगा मतदार बहुसंख्य आहेत. तर दलित आणि कोरबा जातीच्या मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. सध्या वोक्कालिगा मतदारांवर काँग्रेस आणि भाजपाची नजर आहे. मात्र येथील पारंपरिक लढाई ही काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातच होते. तर येथे भाजपा आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.
6 / 9
बंगळुरूचं राजकारण हे काँग्रेस आणि भाजपाभोवती फिरतं. बंगळुरू एक कॉस्मोपॉलिटन शहर आहे. येथे मोठ्या संख्येने शिक्षित आणि मध्यमवर्गीय मतदार आहेत. ते विविधा राज्यांमधून येऊन येथे स्थायिक झालेले आहेत. या भागात बंगळुरू सिटी, बंगळुरू नॉर्थ, बंगळुरू साऊथ आणि बंगळुरू सेंट्रल या भागांचा समावेश होतो. बंगळुरूमध्ये ब्राह्मण मतदार लक्षणीय आहेत. ते भाजपाचे पारंपरिक मतदार आहेत. तर काँग्रेसचे येथील पारंपरिक मतदार हे मुस्लिम आहेत. त्यामुळे येथे काँग्रेस भाजपाला कडवी टक्कर देत असते.
7 / 9
महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या भाहाला मुंबई कर्नाटक म्हटलं जातं. मात्र २०२१ मध्ये मुख्यमंत्री बोम्मई यांनी या भागाचं नाव बदलून कित्तुर कर्नाटक केलं. या संपूर्ण भागामध्ये लिंगायत समुदायाचा दबदबा आहे. त्यांच्यावर भाजपाचं वर्चस्व आहे. भाजपाचा येथील मोठा चेहरा माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा मानले जातात. तसेच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेसुद्धा लिंगायत समुदायातील आहेत. गेल्या निवडणुकीत येथील मुख्य लढत ही काँग्रेस आणि भाजपात झाली होती. तर जेडीएस मुख्य लढतीतही नव्हता.
8 / 9
कर्नाटकचा उत्तर भाग आणि आंध्र प्रदेशला लागून असलेल्या भागाला हैदराबाद कर्नाटक असं म्हटलं जातं. या संपूर्ण भागात काँग्रेस आणि भाजपादरम्यान अटीतटीची लढत होते. तर जेडीएसचा या भागात विशेष जनाधार नाही आहे. येथे काँग्रेसची संपूर्ण मदार ही मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर असते. तर भाजपाकडे या भागात कुणी मोठा नेता नाही आहे. येथील जातीय समिकऱणांचा विचार केल्यास येथे लिंगायत, ओबीसी, बंजारा आण दलित जातींची संख्या लक्षणीय आहे.
9 / 9
मध्य कर्नाटक कर्नाटकमधील भाजपाच सर्वात भक्कम बालेकिल्ला म्हणून मध्य कर्नाटक भाग ओळखला जातो. या भागात कर्नाटकमधील टुमकूर, दावनगेरे, चित्रदुर्ग आणि शिवमोगा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचां समावेश होतो. या भागातही लिंगायत मतदार निर्णायक स्थितीत आहेत. मध्य कर्नाटकमध्ये धार्मिक मठ आणि त्यांच्याशी संबंधित संतांचा राजकारणावर प्रभाव आहे. भाजपाचे दिग्गज नेते येडियुरप्पा हे कर्नाटकमधील शिमोगामधील आहेत. त्यामुळे भाजपाचा शिमोगा आणि चिकमंगळुर भागात दबदबा आहे.
टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)