शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कर्नाटक निवडणूक BJPला जड जाणार की काँग्रेस बाजी मारणार? जनता कुणाला कौल देणार? तुम्हीच पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 1:57 PM

1 / 15
Karnataka Election 2023: १० मे रोजी कर्नाटकात विधानसभा निवडणूक होत आहे. प्रचाराची धूम शिगेला पोहोचली आहे. कर्नाटक राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर पुन्हा एकदा बाजी मारण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्नात आहे. मुख्य लढत भाजप, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांच्यात आहे. कर्नाटकाला राजकीय परिभाषेत दक्षिणेचे द्वार म्हटले जाते.
2 / 15
गेल्या २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक १०४ जागा जिंकल्या होत्या. परंतु बीएस येडियुरप्पा बहुमत सिद्ध करू शकले नाही. जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केली. परंतु, काहीच महिन्यांनंतर भाजपचे बीएस येडियुरप्पा यांनी जेडीएस-काँग्रेस युती तोडून पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यात यश मिळविले. भाजपने जुलै २०२१ मध्ये येडियुरप्पा यांच्या जागी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले.
3 / 15
एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता जनता कुणाच्या पारड्यात कौल टाकतेय, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, यातच कर्नाटकातील प्रमुख नेत्यांना ग्रहांचे पाठबळ किती आहे? कुणाच्या कुंडलीत कोणत्या साडेसाती, महादशा सुरू आहेत? कुणाला ग्रहांचे पाठबळ मिळू शकेल? कोणाला भाग्योदयाचा काळ ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
कर्नाटक विधानसभेतील तिसरा पक्ष जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांचा जन्म १६ डिसेंबर १९५९ रोजी मिथुन लग्न असताना झाला. कुमारस्वामी यांचे वडील देवेगौडा जून १९९६ ते एप्रिल १९९७ दरम्यान भारताचे पंतप्रधान होते. कुमारस्वामी यांना दोनदा कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा बहुमान मिळाला.
5 / 15
पण याला नशिबाचा खेळ म्हणा, कुंडलीत चंद्रापासून केंद्रस्थानी असलेल्या ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे ते कधीही आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. विद्यमान परिस्थितीत दशम भावात विराजमान असलेल्या केतूच्या महादशामध्ये संघर्षाचे स्थान म्हणजेच सहाव्या भावात असलेल्या गुरुच्या अंतर्दशेत कुमारस्वामी यांना समाधानकारक यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत ग्रहांची स्थिती कुमारस्वामी यांच्या बाजूने असल्याचे पाहायला मिळत आहे.
6 / 15
कर्नाटकचे मुख्यमंत्री असलेले बीएस येडियुरप्पा यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९४३ रोजी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात झाला. येडियुरप्पा यांची रास वृश्चिक असून, धनु लग्न रास आहे. ८० वर्षांचे येडियुरप्पा सन २००८ मध्ये प्रथमच कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना २०११ मध्ये राजीनामा द्यावा लागला. मंगळाच्या महादशा सुरू असलेले येडियुरप्पा हे सध्या लिंगायत समाजावर चांगली पकड असलेले कर्नाटकातील भाजपचे सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत.
7 / 15
कुंभ राशीत विराजमान असलेला शनी वृश्चिक राशीतून चतुर्थ भावात 'कंटक-शनी'ची प्रतिकूल स्थिती निर्माण करत आहे. जैमिनी पद्धतीत त्यांची मकर राशीत चर दशा सुरू आहे. त्यामुळे अमात्यकारक गुरू संघर्ष स्थानी म्हणजेच सहाव्या घरात असल्यामुळे येडियुरप्पांसाठी सध्याचा काळ अडथळा, अडचणी, समस्यांचा ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
8 / 15
कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा जन्म २८ जानेवारी १९६० रोजी हुबळी, कर्नाटक येथे झाला. मकर रास आणि मेष लग्न असलेल्या बोम्मई यांच्या कुंडलीत सूर्य आणि बुधाची जवळील अंशांवरील युती त्रासदायक ठरणारी आहे. बसवराज बोम्मईच्या कुंडलीत शनि, मंगळ, गुरु आणि शुक्र यांचा योग नशिबाच्या नवव्या घरात असल्याने त्यांचे वडील प्रभावशाली असल्याचे दिसून येते. दशम आणि अकराव्या स्थानाचा स्वामी शनीची दशा सुरू असलेले बसवराज बोम्मई २००८ ते २०१३ या काळात भाजपच्या राज्य सरकारमध्ये मंत्री होते.
9 / 15
बोम्मई यांच्या कुंडलीमध्ये शनि लग्नेश मंगळासोबत राजयोग बनवत आहे. नवांश कुंडलीत मंगळाशी संयोग होत आहे. २८ जुलै २०२१ रोजी भाजपने बसवराज बोम्मई यांच्याकडे राज्याची सूत्रे सोपवली. यावेळी शनीच्या महादशामध्ये राहुची दृष्टी होती. बसवराज बोम्मईच्या कुंडलीमध्ये सहाव्या स्थानी स्थित राहु आणि शनि गुलिक योग जुळून येत आहे. बसवराज बोम्मई यांच्याच पक्षातील कलहामुळे बसवराज बोम्मई यांना त्रास होऊ शकतो.
10 / 15
जैमिनी चर दशामध्ये मीन राशीची दशा चालू आहे, जी त्याच्या जन्मपत्रिकेत नुकसानाचे स्थान आहे. नवांश आठव्या घरात असल्याने निवडणुकीत मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
11 / 15
कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी.के.शिवकुमार यांचा जन्म १५ मे १९६१ रोजी कनकपुरा येथे झाला. शिवकुमार यांच्या कुंडलीत मेष लग्न राशीत गुरु दशम भावात विराजमान आहे. शनी चौथ्या स्थानी मंगळाच्या नीच दृष्टीने युक्त आहे. या ग्रहस्थितीच्या पाठबळामुळे शिवकुमार कर्नाटकातील लोकप्रिय नेते आहेत. याशिवाय शिवकुमार अमाप संपत्तीचे मालकही आहेत. सन २०१८ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, शिवकुमार ८४० कोटी घोषित संपत्तीचे मालक आहेत.
12 / 15
मेष लग्न असलेल्या शिवकुमारच्या कुंडलीत दुसऱ्या घरात सूर्य, चंद्र आणि बुध यांचा संयोग आहे. ज्यावर दहाव्या स्थानी नवव्या स्वामीची पाचवी दृष्टीही खूप शुभ आहे. शिवकुमार कुंडलीत शुक्र बाराव्या घरात शनी आहे. ज्यामुळे शिवकुमार २०१९ मध्ये टॅक्स आणि मनी लाँड्रिंग प्रकरणांमुळे तुरुंगात जावे लागले होते.
13 / 15
विद्यमान स्थितीत डीके शिवकुमारच्या कुंडलीमध्ये शनी शुक्र आणि राहुच्या विंशोत्तरी दशात आहे. राहु कुंडलीत म्हणजे पाचव्या भावात स्थित आहे. दहाव्या स्थानी सूर्य, बुध आणि चंद्राचा संयोग त्याच्यासाठी शुभ आहे. या शुभ योगांमुळे निवडणुकीनंतर आश्चर्यकारक निकाल येऊ शकतात. येणारा काळ त्यांच्यासाठी शुभ असेल, असे सांगितले जात आहे.
14 / 15
आताच्या घडीला काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. प्रचारसभांना धार चढत असून, राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. जनता आता कुणाच्या पारड्यात मतांचे दान टाकते, भाजपची सरशी होते की काँग्रेस बाजी मारण्यात यशस्वी होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
15 / 15
सदर माहिती केवळ शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य