Keeping gold at home?; Know some rules related to keeping gold at home!
घरात सोने ठेवताय?; जाणून घ्या घरात सोने बाळगण्याशी संबंधित काही नियम! By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 12:30 PM1 / 5भारतात सोने खरेदीला सांस्कृतिक महत्त्व आहे. लोक सणासुदीला सोने खरेदी करणे शुभ समजतात. सोन्याचा भाव नियमितपणे वाढत असल्यामुळे त्याला गुंतवणूक म्हणूनही महत्त्व आहे. 2 / 5असे असले तरी घरात सोने बाळगण्याशी संबंधित काही नियम आहेत. सोन्यातील गुंतवणुकीवर करही लागतो. त्याबद्दल आज जाणून घेऊ या. 3 / 5केंद्रीय थेट कर बोर्डानुसार (सीबीडीटी), गुंतवणूकदाराने घोषित उत्पन्नातून अथवा शेतीसारख्या आयकर सूट असलेल्या उत्पन्नातून सोने खरेदी केले असल्यास कर लागत नाही. याशिवाय वाजवी घरगुती बचतीतून अथवा वारसा हक्क्याने मिळालेल्या उत्पन्न स्रोतातून केलेल्या सोने खरेदीवरही कर लागत नाही. 4 / 5भारतीय नागरिकांना ठरावीक वजनाइतके सोने बाळगण्याची परवानगी आहे. ठरावीक वजनापेक्षा कमी सोन्याचे दागिने तपास अधिकारी छाप्यातही जप्त करू शकत नाहीत. विवाहित स्त्री ५०० ग्रॅम सोने बाळगू शकते. अविवाहित स्त्री २५० ग्रॅम सोने, तर कुटुंबातील पुरुष सदस्य १०० ग्रॅम सोने बाळगू शकतो. याशिवाय, ज्ञात स्रोतातून मिळालेल्या उत्पन्नातून खरेदी केलेले कितीही सोने बाळगण्याचा अधिकार भारतीय नागरिकास आहे. 5 / 5सोने बाळगण्यास कर लागत नसला तरी विक्रीसाठी हा नियम लागू होत नाही. तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जवळ बाळगलेले सोने विकल्यास त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर २० टक्के दराने दीर्घकालीन भांडवली लाभ कर (एलटीसीजी) लागतो. खरेदीनंतर ३ वर्षांच्या आत सोने विकल्यास त्यातून मिळणारे उत्पन्न व्यक्तीच्या नियमित उत्पन्नात गृहीत धरले जाते. त्यावर आयकर स्लॅबनुसार कर लागतो. आणखी वाचा Subscribe to Notifications