kerala thug monson mavunkal arrested who made fraud of Millions of rupees from fake antique items
कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारा 'ठग' ताब्यात, बनावट अँटीक वस्तुंच्या म्यूजियमद्वारे करायचा फसवणूक By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 11:30 AM1 / 8 कोच्ची: केरळमध्ये अनेकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका मोठ्या 'ठगाला' पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या राज्यात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. मॉन्सन मावुंकल(54)असं पकडलेल्या आरोपीचं नाव असून, त्याने मागील गेल्या अनेक वर्षांत बनावट प्राचीन वस्तूंचे संग्रहालय उभारुन आणि इतर गोष्टींमधून 10 कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.2 / 8 स्वयंघोषित प्राचीन वस्तु विक्रेता मॉन्सनने त्याच्या संग्रहालयात टिपू सुलतानचे सिंहासन, येशूने वापरलेले कपडे, पैगंबर मुहम्मद यांनी वापरलेले कप अशा दुर्मिळ प्राचीन वस्तू असल्याचा दावा केला. तसेच, त्याने आपल्या घरांमध्ये या बनावट प्राचीन वस्तूंचे संग्रहालय बनवले होते. 3 / 8 त्याने त्याच्या वेबसाइटवर स्वतःला एक शिक्षणतज्ज्ञ, जागतिक शांतता प्रवर्तक आणि वेबसाइटवर अभिनयाचा चाहता असल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही तर त्याच्याकडे http://monsonmavunkal.com नावाची वेबसाईट आहे, ज्यामध्ये त्याने या सर्व बनावट वस्तूंची छायाचित्रे टाकली आहेत. या वेबसाईटमध्ये त्याने अतिशय प्रभावी चित्रे टाकली आहेत, ज्यामुळे दर्शक फसतात.4 / 8 वेबसाइटमध्ये पोर्टफोलिओसारखे त्याचे अनेक फोटो आहेत, ज्यात त्याने स्वतःचा अभिनय उत्साही म्हणून वर्णन केलं आहे. वरील सर्व फोटो या वेबसाईटवरुन घेतले आहेत. त्याच्या कलिंगा कल्याण फाउंडेशन आणि कॉसमॉस ग्रुप नावाच्या दोन कंपन्यादेखील आहेत. यावर क्लिक केल्यावर वेबसाइट अंडर मेन्टेनंस असा मेसेज आला.5 / 8आरोपी मॉन्सनने अभिनेत्री करीना कपूरच्या नावाने एक महागडी पोर्श कारही खरेदी केली आहे. विशेष गुन्हे शाखेच्या तपासात सर्व कलाकृती बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. तक्रारदारांनी पोलिसांना सांगितले की, या प्रदर्शनांमुळे त्यांनी कागदपत्रे न पाहता आरोपीला कर्ज दिले. पण, नंतर हे सगळं बनावट असल्याचं समोर आलं.6 / 8 या कागदपत्रांमध्ये डीआरडीओचे बनावट पत्रही होते. या पत्रात असे लिहिले होते की, मॉन्सनकडे करोडो किमतीची रसायने आहेत, जी रॉकेट लाँच करण्यासाठी वापरली जातात. केरळच्या डीजीपीने स्वाक्षरी केलेलं एक पत्र देखील आहे, ज्यात असे म्हटले आहे की मॉन्सनच्या दुर्मिळ वस्तूचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षा उपकरणे बसवण्यात आली आहेत.7 / 8 मॉन्सनने बँक व्यवहार, आरबीआय, वित्त मंत्रालय आणि अंमलबजावणी विभाग यांची बनावट कागदपत्रेही तयार केली होती. मॉन्सन असा दावा करायचा की, तो 25 वर्षांपासून जगभरातील पुरातन वस्तू गोळा करत आहे आणि लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी तो परदेशातून येणारे 2.6 लाख कोटी रुपये आरबीआयच्या नियमांमुळे अडकले आहेत. हे पैसे गल्फ खात्यातून केरळ खात्यात हस्तांतरित करण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता आहे.8 / 8 मॉन्सनचा जन्म अलाप्पुझाच्या एका सामान्य कुटुंबात झाला. त्याने एका चर्चमध्ये प्रचारक म्हणून काम केले. लक्झरी आयुष्य जगण्यासाठी त्याने एक सुरक्षा एजन्सी नेमली होती आणि परिसरात कॅमेऱ्यांचे जाळे उभे केले होते, जेणेकरून संग्रहालयात येणारे पर्यटक प्रभावित होतील. व्हीआयपी लोकांसोबत त्याचे फोटोही होते. यात केरळचे मंत्री, डीजीपी, डीआयडी दर्जाचे अधिकारी आणि मोहन लाल सारखे सुपरस्टार यांचा समावेश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications