शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खाकी पँट, कमळाचे फुल आणि गुलाबी रंग! नव्या संसदेतील कर्मचाऱ्यांसाठी नवा गणवेश; पाहा कसा असणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 1:09 PM

1 / 6
संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत मोठी अपडेट हाती येत आहे. १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड असणार आहे. पहिल्याच दिवशी हे अधिवेशन जुन्या संसदेत भरविले जाणार आहे, नंतर म्हणजेच १९ सप्टेंबरपासून नव्या संसदेत कामकाज केले जाणार आहेत.
2 / 6
१८ सप्टेंबरला जुन्या संसदेत सध्याच्या संसदेतील आठविणींना उजाळा दिला जाणार आहे. दुसऱ्या दिवशी पूजा अर्चेनंतर नवीन संसदेत प्रवेश केला जाणार आहे. या दिवशी दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीचे नियोजनही केले जाऊ शकते. नव्या संसदेतील लोकसभेत दोन्ही सभागृहांचे सदस्य एकाचवेळी बसू शकतील एवढी जागा आहे.
3 / 6
नव्या संसदेबरोबर आणखी एक बदल होण्याची शक्यता आहे. तो म्हणजे, संसदेतील कर्माचाऱ्यांच्या ड्रेसकोडमध्ये बदल होणार आहे. संसद भवनातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन गणवेश तयार करण्यात आला आहे. हा ड्रेस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी म्हणजेच NIFT ने डिझाइन केला आहे.
4 / 6
सचिवालयातील कर्मचाऱ्यांचा गणवेश बंद नेक सूटमधून किरमिजी किंवा गडद गुलाबी नेहरू जॅकेटमध्ये बदलला जाईल. त्यांचा शर्ट देखील गडद गुलाबी असेल. ज्यावर कमळाचे फूल असेल आणि ते खाकी रंगाची पॅन्ट घालतील.
5 / 6
दोन्ही सभागृहांच्या मार्शलचा गणवेशही बदलणार आहे. हे मार्शल मणिपुरी पगडी परिधान करतील. आधीचा सफारी सूट बदलून तो कमांडोप्रमाणे केमोफ्लॉज ड्रेसमध्ये दिसणार आहे.
6 / 6
या ड्रेसकोडवरून आता काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे. लोकसभेतील पक्षाचे चीफ व्हिप माणिकम टागोर यांनी ट्विट करून कमळाचेच फूल का? मोर, वाघ का नाही... अरे ही भाजपची निवडणूक चिन्हे नाहीत ना... असे म्हटले आहे. टागोर यांनी लोकसभा अध्यक्षांनाही याबाबत विचारणा केली आहे.
टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसद