Know 10 important things about rapist Baba Ram Rahim
जाणून घ्या बलात्कारी बाबा राम रहीमबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 4:40 PM1 / 11गुरमीत राम रहीमला बलात्काराच्या आरोपाखाली 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2002 मध्ये त्याच्या एका अनुयायाने आपल्यावर आणि इतर दोघींवर राम रहीमने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. बलात्कार पीडितेने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासहित पंजाब आणि हरियाणाच्या न्यायाधीशांना पत्र लिहून आपबीती सांगितली होती. न्यायालयाने 2007 मध्ये सीबीआय चौकशीचा आदेश दिला होता. 2 / 11गुरु राम रहीमचा जन्म 15 ऑगस्ट 1967 रोजी राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे झाला. नसीब कौर आणि मघार सिंह हे त्याच्या आई-वडिलांचं नाव. गुरु राम रहीम आई - वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. हरजीत कौर या महिलेशी त्याचं लग्न झालं असून, त्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे.3 / 11बलुचिस्तानच्या शाह मस्ताना यांनी 1948 रोजी डेरा सच्चा सौदाची स्थापना केली होता. यानंतर शाह सतनाम यांनी 1948 ते 1960 पर्यंत डेरा सच्चा सौदाचं नेतृत्व केलं. गुरमीत राम रहीमचे वडिल सतनाम यांचे भक्त होते. त्यांनी आपल्या मुलाला डेरा सच्चा सौदाच्या हवाली केलं. 4 / 1123 सप्टेंबर 1990 रोजी शाह सतनाम यांनी गुरमीत राम रहीम याच्याकडे सर्व सूत्रं सोपवत डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बनवलं. 5 / 11गुरमीत राम रहीमच्या समर्थकांची संख्या खूप मोठी आहे असून जगभरात जवळपास दोन लाख समर्थक आहेत. ट्विटरवर त्याचे 30 लाख 74 हजार फॉलोअर्स आहेत. श्री श्री रवीशंकर (20 कोटी 26 लाख) आणि योगगुरु बाबा रामदेव (938 हजार) यांचेही इतके फॉलोअर्स नाहीत. 6 / 11गुरमीत राम रहीम नुसता अध्यात्मिक गुरु नसून एक सिंगर, अॅक्टर आणि व्यवसायिकदेखील आहे. त्याने मेसेंजर ऑफ गॉड नावाचा चित्रपटही केला आहे. चित्रपटाचे प्रोमो पाहिले असतील तर भडक कपडे घालून बाईक चालवताना, फायटिंग करताना राम रहीमला दाखवण्यात आलं आहे.7 / 11गुरमीत राम रहीम अध्यात्मिक गुरु म्हणून ओळखला जात असला तरी त्याचं राहणीमान एखाद्या श्रीमंताला लाजवेल असंच आहे. तो रेंज रोव्हर एसयुव्ही चालवतो. इतकंच नाही तर जेव्हा तो निघतो तेव्हा 100 गाड्यांचा ताफा त्याच्यासोबत असतो. 8 / 11रॉकस्टार राम रहीम मॉडर्न पद्धतीने अध्यात्म शिकवतो. तशीच त्याची ओळख आहे. 'नाम चर्चा', आणि 'रुबरु नाईट्स' मधून राम रहीम भक्तांना अध्यात्म शिकवत असतो. यावर्षी त्याच्या वाढदिवसाला 125 समर्थकांनी एकाच वेळी केकवर दीड लाख मेणबत्त्या पेटवल्या होत्या 9 / 11व्हीव्हीआयपी दर्जा आणि झेड लेव्हल सुरक्षा मिळणा-या देशभरातील 36 जणांमधील एक नाव गुरमीत राम रहीमचं आहे. हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमधील राजकीय नेत्यांमध्ये राम रहीमचा प्रचंड प्रभाव असून त्याचे अनुयायी आहेत.10 / 11डेरा सच्चाच्या समर्थकांनी डिसेंबर 2003 मध्ये सर्वात मोठं रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा रेकॉर्ड केला आहे. या शिबीरात 15 हजार डोनर सहभागी झाले होते. 11 / 11युकेमधील वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीने राम रहीमला डॉक्टरेट डिग्री दिली आहे. राम रहीमच्या नावे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये 53 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. यामधील 17 गिनीज रेकॉर्ड, 27 एशिया बूक रेकॉर्ड, सात इंडिया बूक रेकॉर्ड आणि दोन लिमका बूक रेकॉर्ड आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications