शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 8:40 PM

1 / 13
उत्तर प्रदेशातील अयोध्येत लवकरच भव्य राम मंदिराच्या निर्माण कार्याला प्रारंभ होणार आहे. 18 जुलैला मंदिर निर्माणासंदर्भात रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची अयोध्येत बैठक पार पडली. या बैठकीत मंदिराच्या बांधणीसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच मंदिराच्या भूमीपूजनाची तारीख 5 ऑगस्ट निश्चित करण्यात आली.
2 / 13
कधीपर्यंत पूर्ण होईल राम मंदिराचे काम - सर्वोच्च न्यायालयाकडून मंदिराच्या बाजूने निर्णय आलयापासूनच मंदिर निर्माणाची तयारी सुरू झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानेच मंदिर निर्माणासाठी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आली. मंदिराच्या आराखड्यावर अंतिम मोहर लगल्यानंतर तीन ते साडे तीन वर्षाच्या आत मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, असे ट्रस्टमधील लोकांचे म्हणणे आहे.
3 / 13
​भूमीपूजनासाठी पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित? अयोध्येत 18 जुलैला झालेल्या बैठकीनंतर राम मंदिर ट्रस्टच्या वतीने 3 आणि 5 ऑगस्टचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यापैकी 5 ऑगस्टला पंतप्रधान कार्यालयाकडून मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या शिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
4 / 13
कसे असेल मंदिर - राम मंदिराच्या बाजूने निकाल आल्यापासून मंदिर कसे असेल, याचीच सर्वाधिक चर्चा सुरू आहे. मंदिरासंदर्भात विश्व हिंदू परिषदेचे मॉडेल आपल्या समोर होते. मात्र, आता त्यात काही बदल केले जाणार आहेत. मंदिराच्या या मॉडेलचे शिल्पकार चंद्रकांत सोमपुरा हे आहेत. मंदिर आणखी भव्य बनवण्याची तयारी आहे.
5 / 13
​किती मजल्याचे मंदिर ? - राम मंदिराच्या जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवे मॉडेल वेगळे आहे. नव्या मॉडेलमध्ये राम मंदिराची उंची, रुंदी आणि लांबी, या तीनही गोष्टी वाढवल्या आहेत. आता हे मंदिर दोन एवजी तीन मजली असेल. मंदिराची ऊंची 33 फुटांनी वाढवण्यात येत आहे. यामुळे आणखी एक मजला वाढवण्यात येत आहे.
6 / 13
किती असेल मंदिराची उंची? - मंदिराच्या जुन्या मॉडेलनुसार मंदिराची लांबी 268 फूट 5 इंच एवढी होती. आता ती वाढवून 280-300 फूट केली जाऊ शकते. याशिवाय मंदिराची रुंदीदेखील वाढवून साधारण पणे 272-280 फूट केली जाऊ शकते. यापूर्वी मंदिराची रुंदी 140 फूट ठेवण्याचा विचार होता. याशिवाय मंदिराची उंचीही 128 फूटांवरून 161 फूट करण्याचा विचार आहे.
7 / 13
​मंदिराला किती कळस? राम मंदिराच्या पहिल्या मॉडेलमध्ये तीन कळस प्रस्तावित होते. मात्र, आता या तीन मजली मंदिराला 5 कळस (घुमट) असतील, असे समजते.
8 / 13
​किती खांबांचे असेल मंदिर? - राम मंदिराच्या नव्या मॉडेलप्रमाणे, संपूर्ण मंदिरात एकूण 318 खांब असणार आहेत. तर मंदिराच्या प्रत्येक मजल्यावर तब्बल 106 खांब तयार करण्यात येणार आहेत.
9 / 13
हे आहेत मंदिराचे शिल्पकार? - विश्व हिंदू परिषदेने सादर केलेल राम मंदिराचे मॉडेल आर्किटेक्ट चंद्रकांत सोमपुरा यांनी तयार केले होते. आता नव्या मॉडेलवरही तेच काम करत आहेत. याशिवाय त्यांची मुले निखिल आणि आशीष हे देखील या नव्या मॉडेलवर काम करणार आहेत.
10 / 13
18 जुलैला झालेल्या ट्रस्टच्या बैठकीतही या दोघांनाही बोलावण्यात आले होते. निखिल आणि आशीष हे अभियंता आहेत. ते दोघेही मंदिराच्या मॉडेलमध्ये करण्यात आलेल्या बदलांवर काम करतील.
11 / 13
​किती खर्च येणार - मंदिरचे शिल्पकार सोमपुरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या डिझाइन प्रमाणे मंदिर निर्माणासाठी किमान 100 कोटी रुपये एवढा खर्च लागू शकतो. हा खर्च वाढूही शकतो. निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अधिक संसाधने आणि पैशांची आवश्यकता लागू शकते.
12 / 13
सर्वात उंच मंदिर? - राम मंदिराच्या नव्या मॉडेलमध्ये मंदिराची उंची वाढवण्यात आली आहे. मात्र, तरीही ते भारतातील सर्वात उंच मंदिर असणार नाही. हिमाचल प्रदेशातील सोलन येथे भारतातील सर्वात उंच मंदिर आहे. हे मंदिर बांधायला तब्बल 39 वर्ष लागले होते.
13 / 13
राम जन्मभूमी अयोध्या...
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी