RAW चं सीक्रेट मिशन! भारताचा 'ब्लॅक टायगर' बनला होता पाकिस्तानात मेजर; शत्रूची झोप उडवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 11:58 IST
1 / 10नोव्हेंबर १९७५ च्या रात्री एका गुप्तहेराला भारतातून पाकिस्तानात पाठवण्यात आले. भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या रिसर्च अँन्ड एनालिसिस विंग म्हणजे (RAW) चे रवींद्र कौशिक असं त्यांचं नाव होते. पाकिस्तानात राहून त्यांनी जे धाडस केले त्यामुळे भारत सरकार पाकिस्तानला अनेक आघाड्यांवर मात देण्यात यशस्वी झाले. रवींद्र कौशिक यांची पाकिस्तानात जाण्यापूर्वी सुंताही केली होती. त्याशिवाय त्यांना एक मुस्लीम नाव दिले होते, जेणेकरून त्यांची खरी ओळख कुणालाही कळू नये. अलीकडेच अमेरिकेच्या धार्मिक स्वतंत्रता आयोगाने रॉवर बंदीची मागणी केली. आता रॉ नेमकं कसं काम करते, आतापर्यंत रॉ यंत्रणेमुळे किती यश मिळालं हे जाणून घेऊया. 2 / 10RAW ची सुरुवात १९६८ साली झाली, त्याचा प्रमुख हेतू चीनचा प्रभाव कमी करणे हा होता परंतु हळूहळू त्याचे लक्ष भारताचा दुसरा शत्रू पाकिस्तानवर गेले. RAW आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI मागील कित्येक दशकांपासून एकमेकांविरोधात सीक्रेट मिशन ऑपरेट करतात. काश्मीर मुद्द्यांवरून यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र आहे. RAW चीन, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका, पाकिस्तानसारख्या शेजारील देशांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवते.3 / 10१९५२ साली राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये एका पंजाबी कुटुंबात जन्मलेले रवींद्र कौशिक यांनी कधी विचारही केला नसेल की ते भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे गुप्तहेर बनतील. लहान वयापासून त्यांना सिनेक्षेत्राची आवड होती. एकदा थिएटरमध्ये त्यांच्यावर RAW अधिकाऱ्याची नजर पडली. त्यानंतर त्यांचे आयुष्यच बदलले. २३ व्या वर्षी ते कायमचे पाकिस्तानला गेले. रवींद्र कौशिक यांच्यावर एक सिनेमाही बनला आहे. ज्यात सलमान खाननं मुख्य भूमिका निभावली आहे. हा सिनेमा म्हणजे एक था टायगर...4 / 10रवींद्र कौशिक जेव्हा थिएटर करत होते तेव्हा त्यांना एका लष्कर अधिकाऱ्याची भूमिका मिळाली. ज्यांना चीनमध्ये पकडल्यानंतर भारताशी निगडीत महत्त्वाची माहिती देण्यास नकार दिला. त्यांचा अभिनय पाहून रॉ अधिकाही खुश झाले. या अधिकाऱ्यांनी चक्क रवींद्र कौशिक यांना रॉमध्ये येण्याची ऑफर दिली. रॉ ज्वाईन केल्यानंतर रवींद्र कौशिक यांनी २ वर्ष जीवतोड मेहनत घेतली. कठोर ट्रेनिंगनंतर १९७५ साली पहिल्यांदा मिशन एक्स अंतर्गत पाकिस्तानला गेले.5 / 10रवींद्र कौशिक यांना नबी अहमद शाकीर नावाने पाकिस्तानात पाठवण्यात आले. तिथे कराची लॉ यूनिवर्सिटीत त्यांनी प्रवेश घेतला. तिथे पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर पाकिस्तानी लष्करात कमिशन अधिकारी म्हणून नोकरीही मिळवली. त्यानंतर पाकिस्तान लष्करात मेजर पदावर त्यांची बढती झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना ब्लॅक टायगर असं नाव दिले होते. रवींद्र कौशिक यांनी पाकिस्तानात एका स्थानिक मुस्लीम मुलीसोबत लग्न केले. त्यांना एक मुलगीही आहे. तिथे त्यांनी उर्दू भाषा शिकली. १९७९ ते १९८३ पर्यंत पाकिस्तानातून त्यांनी महत्त्वाची माहिती भारताला पाठवली. ज्यातून भारताला संरक्षण रणनीतीत खूप मदत झाली. या काळात पाकिस्तानचं प्रत्येक पाऊल अपयशी ठरत होते कारण त्यांच्या सर्व योजना, प्लॅनिंगची माहिती भारताला आधीच मिळायची. 6 / 10RAW ने एका गुप्तहेराला काशिक यांना भेटण्यासाठी पाकिस्तानला पाठवले त्याला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने पकडले. १९८३ साली भारतीय गुप्तहेर इनायत मसीहा बॉर्डर क्रॉस करताना पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागला. त्यांनी चौकशीत रवींद्र कौशिक यांचे रहस्य उलगडले. त्यानंतर कौशिक यांना अटक करून मुल्तान जेलमध्ये टाकण्यात आले. पाकिस्तान लष्काराला कधीही जाणवले नाही की रवींद्र कौशिक हे भारतीय गुप्तहेर त्यांच्यात राहून काम करत आहेत. रवींद्र कौशिक यांना आमिष दाखवले जेणेकरून ते भारताची गोपनीय माहिती त्यांना देतील. परंतु कौशिक यांनी तोंड उघडले नाही. १९८५ साली कौशिक यांना मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली ती कालांतराने जन्मठेपेत रुपांतरीत करण्यात आली. २००१ साली मियांवाली जेलमध्ये रवींद्र कौशिक यांचा हार्टअटॅकने मृत्यू झाला. 7 / 10रॉ संस्थेवर नेहमी शेजारील देशांमध्ये दखल देण्याचा आरोप लागला आहे. अफगाणिस्तानच्या सीमेलगत पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात बंडखोरांना ट्रेनिंग आणि हत्यार देण्याचं काम RAW करते असं पाकिस्तानला वाटते. मात्र RAW ने हे आरोप फेटाळले आहेत. तर RAW ने ISI वर जुलै २००८ मध्ये काबुलमध्ये भारतीय दूतावास कार्यालयावर बॉम्ब हल्ला करण्याचा आरोप केला आहे.8 / 10१९६८ पर्यंत इंटेलिजेंस ब्यूरो भारताची अंतर्गत गुप्तचर माहितीसोबत परदेशी गुप्त विभाग सांभाळत होती. परंतु १९६२ साली चीनसोबत युद्धात भारताच्या खराब कामगिरीनंतर परदेशातील गुप्तचर यंत्रणा वेगळी असावी असं पुढे आले. २००७ च्या इंडियाज एक्सटर्नल इंटेलिजेंस - RAW या पुस्तकात मेजर जनरल वीके सिंह यांनी चीन भारतावर हल्ला करणार याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली नाही असं लिहिलं होते.9 / 10RAW ला परदेशात भारतीय प्रभाव वाढण्याचं श्रेय दिले जाते. RAW ची ताकद आणि भारताचं परराष्ट्र धोरण या भूमिका विविध पंतप्रधानांच्या काळात बदलत राहिल्या आहेत. रॉ ने अनेक परराष्ट्रीय धोरण यशस्वी करण्यात मोठी भूमिका निभावल्याचं पुढे आले आहे. 10 / 10अमेरिकेचे यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलीजियस फ्रिडमने २०२५ चा वार्षिक रिपोर्ट प्रसिद्ध केला. त्या रॉ वर बंदी आणण्याची मागणी केली. २०२३ मध्ये न्यू यॉर्कमध्ये एका अमेरिकन शीख फुटीरतावादीच्या हत्येच्या प्रयत्नात रॉ अधिकारी आणि सहा राजनयिकांचा सहभाग असल्याच्या आरोपांना आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग आणि कॅनेडियन सरकारच्या गुप्तचरांनी पुष्टी दिली आहे. संघटनेने अमेरिकन सरकारला रॉ वर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाने १७ ऑक्टोबरला भारतीय नागरिक विकास यादव यांच्यावर हत्या आणि मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.