Know about the woman who is walking with wing commander Abhinandan at Wagah Border
अभिनंदन यांच्यासोबत वाघा बॉर्डरवर आलेली 'ती' महिला कोण? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 4:13 PM1 / 6आपल्या जबरदस्त कौशल्यानं मिग-21 मधून पाकिस्तानी हवाई दलाचं अत्याधुनिक एफ-16 विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन काल भारतात परतले. वाघा बॉर्डरवरुन मायदेशात परतताना अभिनंदन यांच्यासोबत एक महिला होती. ही महिला कोण, याची चर्चा बऱ्याच ठिकाणी सुरू होती. 2 / 6अभिनंदन यांच्यासोबत असलेली महिला त्यांची पत्नी असल्याचा काहींचा समज होता. मात्र अभिनंदन यांनी सीमा ओलांडताच त्यांच्यासोबत आलेली महिला पुन्हा माघारी म्हणजेच पाकिस्तानात परतली. 3 / 6सोशल मीडियावर चर्चेत राहिलेल्या या महिलेचं नाव डॉक्टर फरिहा बुगती आहे. त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात काम करतात.4 / 6परराष्ट्र मंत्रालयातील भारताशी संबंधित प्रकरणं बुगती हाताळतात. त्या एफएसपी अधिकारी आहेत. भारतात ज्या प्रमाणे आयएफएस अधिकारी असतात, त्या प्रमाणे पाकिस्तानात एफएसपी असतात. 5 / 6पाकिस्तानच्या ताब्यात असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणदेखील बुगती हाताळत आहेत. 6 / 6गेल्या वर्षी कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीनं कुलभूषण यांची इस्लामाबादमध्ये भेट घेतली होती. त्यावेळीही बुगती तिथे उपस्थित होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications