know the happenings two days before independence day on 13 august 1947
देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी दोन दिवस आधी असे होते वातावरण... By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 10:28 AM1 / 4मुंबई : येत्या 15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून 72 वर्ष होतील. स्वातंत्र्यदिन सोहळ्याला दोन दिवस बाकी असले तरीही 72 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी देशात कसे वातावरण होते जाणून घेऊया, स्लाईडच्या रुपात.2 / 4देशाची दोन भागात फाळणी झाली होती. याबरोबरच हिंदू - मुस्लिम यांचेही विभाजन सुरु झाले होते. 13 ऑगस्टला मुस्लिमांनी दिल्लीला ट्रेनमध्ये बसून पाकिस्तानात जाण्यास सुरुवात केली होती. तर दुसरीकडे पाकमधून हिंदूंना भारतात पाठिवले जात होते. मात्र, भारतात येणाऱ्या हिंदुंची स्थिती फारच विदारक होती. ट्रेनच्या बोगींमध्ये मृतदेह खचाखच भरलेले होते. एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्याची तयारी सुरु होती. तर , दुसरीकडे फाळणीवरून चारही बाजुला रक्तपात होत होता. 3 / 4फाळणीच्या घोषणेनंतर कित्येक लोकांना त्यांचे राहते घर, शेती, कामधंद्यावर पाणी सोडावे लागले. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेले हे स्थलांतर जगातील एकमेव असेच होते. हे स्थलांतर 50 ते 60 दिवसांत झाले. विस्थापितांची संख्या जवळपास 1.45 कोटी होती. 1951 च्या जनगणनेनुसार भारत सोडणारे 72 लाख 26 हजार लोक तर भारतात आलेले 72 लाख 49 हजार हिंदू, शीख होते. 4 / 4फाळणीच्या काळात जवळपास 20 लाख लोक मारले गेल्याची शक्यता अनेकांनी वर्तविली होती. भारतात आलेल्या हिंदूंना आपली विस्कटलेले आयुष्य पुन्हा सावरण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आणखी वाचा Subscribe to Notifications