Know, if Prime Minister Narendra Modi gets angry what do they do?
जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींना राग आला तर ते काय करतात? By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 5:34 PM1 / 6अभिनेता अक्षयकुमारने पीएम नरेंद्र मोदी यांची अराजकीय मुलाखत घेतली. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. त्यावेळी अक्षयकुमारने मोदी यांना तुम्हाला राग येतो का? असा प्रश्न केला त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी मला लवकर राग येत नाही मात्र जर कधी राग आला तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी एक उपाय करतो आणि माझा राग शांत होतो. 2 / 6पीएम नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, जर मला कधी राग आला तर मी एक कागद घेतो त्यावर एक गोष्ट लिहितो. त्यानंतर कागद फाडून फेकून देतो. परत मी एक कागद घेतो. पुन्हा एकदा कागदावर गोष्ट लिहितो, परत पुन्हा कागद फाडून फेकून देतो. त्यामुळे कागदासोबत माझा रागही निघून जातो. 3 / 6यानंतर मुलाखतीत अक्षय सांगतो की, पहिल्यांदा जेव्हा आपली भेट झाली तेव्हा तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री होता. त्यावेळी मी एक विनोद सांगितला होता. तेव्हा तुम्हीही मला विनोद सांगितला. मग पंतप्रधान बनल्यानंतर तुमच्या स्वभावात काही बदल झालेत का? कारण बाहेर आपली प्रतिमा कडक स्वभावाची आहे. 4 / 6यावर नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, असं काहीच बदल झालेला नाही. माझी प्रतिमा चुकीच्या पद्धतीने बनवली गेली. मी कामाच्या वेळी काम करतो. समजा, मी एका मिटींगमध्ये आहे आणि त्या बैठकीत कोणाकडे मोबाईल असेल तर रिंग वाजल्यानंतर त्याचं लक्ष मोबाईलकडे जातं. तर तेव्हा मी त्यांना विचारतो सांगा मी आता काय बोललो ते. त्यानंतर मिटींगमध्ये कोणी मोबाईल घेऊन येत नाही.5 / 6मुलाखती दरम्यान अक्षय कुमार याने मोदींना विचारले की, तुम्हाला कधी वाटलेलं तुम्ही पंतप्रधान बनणार? यावर मोदी म्हणाले, मी कधीच हा विचार केला नाही की मी पंतप्रधान बनेल. जर मला कुठे नोकरी लागली असती तर माझ्या आईने संपूर्ण गावात मिठाई वाटली असती. 6 / 6तसेच 1962 च्या युद्धादरम्यान मेहसाणा स्टेशनवर कधी जवानांना पाहिलं तर मला आनंद व्हायचा. मी देखील गुजरात सैनिक स्कूलमध्ये जाऊन तिथे प्रवेश घेण्याचा विचार करत होतो. मात्र तसं झालं नाही. मी कधीच विचार केला नव्हता मी एकवेळ देशाचा पंतप्रधान बनेल असा. मात्र ते प्रत्यक्षात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications