शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' ठिकाणी कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक, 'व्हायरस वॉच स्टडी'तून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 9:58 AM

1 / 9
नवी दिल्ली : देशभरातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. सलग 7 दिवस दररोज नवीन कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक बनत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, एवढी सुरक्षितता असतानाही कोरोनाचा प्रादुर्भाव होतोच कुठे? जेव्हा ओमायक्रॉन आला तेव्हा लोकांना वाटले की, हे सर्व परदेशी आणि परदेशातून परतलेले लोक पसरत आहेत.
2 / 9
पण जेव्हा परदेशातून परतलेल्या लोकांचे ट्रेसिंग करण्यात आले आणि ९० टक्के प्रकरणांमध्ये अशा लोकांना घरी पाठवण्याऐवजी क्वारंटाईन करण्यात आले, तेव्हा अचानक देशभरात कोरोनाचा प्रसार इतक्या वेगाने का आणि कसा झाला? कारण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची अनेक कारणे असू शकतात, ज्याकडे तुमचे लक्ष कधीच जात नाही.
3 / 9
ज्यावेळी ओमायक्रॉनचा भारतात प्रादुर्भाव वाढत आहे, अशा वेळी एका स्टडीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्टडीला ब्रिटन सरकारने गांभीर्याने घेत आपल्या अधिकृत वेबसाइट www.gov.uk वर प्रकाशित केले असून, लोकांना कोरोनापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.
4 / 9
या स्टडीत लोकांच्या अशा दैनंदिन घडामोडींबद्दल सांगण्यात आले आहे, जे कोणालाही व्हायरस संसर्गास असुरक्षित बनवण्यासाठी सर्वात जास्त जबाबदार आहेत. खरंतर, 'व्हायरस वॉच स्टडी'च्या (Virus Watch Study) अलीकडील रिपोर्ट असे म्हटले आहे की, शॉपिंग, सार्वजनिक वाहतूक वापरणे आणि कामासाठी बाहेर जाणे ही देखील कोरोना पसरण्याची मुख्य कारणे आहेत. गेल्या आठवड्यात आलेल्या या रिपोर्टमध्ये त्या वेगवेगळ्या गैर-घरगुती उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. जेव्हापासून कोरोनाबाबत कठोरता नव्हती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतीय लोक आक्रोश विसरायला लागली होती.
5 / 9
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून भारतात कोरोनाच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनाच्या ताज्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली असून देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 4000 वर गेली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने जोखमीच्या कामांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. शक्य तितक्या अशा उपक्रमांवर बंदी घालावी.
6 / 9
स्टडीनुसार, कोरोना संसर्गास कारणीभूत असलेल्या अॅक्टिव्हिटीजमध्ये खरेदीसाठी बाहेर जाणे, कामासाठी बाहेर जाणे, सार्वजनिक वाहतूक वापरणे, रेस्टॉरंटमध्ये खाणे यांचा समावेश आहे. देशभरातील राज्य सरकारे रात्रीच्या कर्फ्यूपासून सातत्याने कडक करण्यात येत आहे. देशात पुन्हा एकदा लग्न आणि अंत्यसंस्कार यांसारख्या ठिकाणी लोकांची संख्या ठरवली जाऊ लागली आहे. अशा परिस्थितीत आतापासूनच सतर्क राहण्याची गरज आहे.
7 / 9
या रिसर्चमध्ये, त्या अॅक्टिव्हिटीजबाबत देखील सांगण्यात आले आहे, जे कोरोना संसर्ग एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीमध्ये पसरविण्यात यशस्वी झाले नाहीत. संशोधकांनी सांगितले की, सिनेमा हॉल, थिएटर, ब्युटी पार्लर किंवा सलून ही अशी ठिकाणे आहेत, जिथे कोरोनाचा धोका सध्या तरी दिसत नाही.
8 / 9
स्टडीनुसार, घराबाहेरील व्यक्तीसोबत शेअर केलेली कार वापरणे, इनडोअर रेस्टॉरंट, कॅफे किंवा कॅन्टीनमध्ये खाणे, इनडोअर आणि आउटडोअर पार्ट्या यासारख्या अॅक्टिव्हिटिजना देखील संसर्गाचे कारण ठरले आहे. रिचर्सनुसार, कोरोनाच्या या व्हायरसचा प्रसार अशा वेगाने होत आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याचबरोबर, स्टडीने चेतावणी दिली आहे की, जे लोक आठवड्यातून दोनदा मॉल किंवा स्ट्रीट मार्केटमध्ये खरेदीसाठी जातात त्यांना इतरांपेक्षा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
9 / 9
स्टडीत असे म्हटले आहे की, लोकांच्या कठोर निर्बंधांच्या दरम्यान आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय खरेदी करण्याच्या सवयीमुळे घराबाहेर संसर्ग वाढला आहे. कामावर जाणे आणि सार्वजनिक वाहतूक वापरणे यासारख्या इतर अॅक्टिव्हिटिज संसर्ग पसरविण्यात मोठी भूमिका बजावली आहे. मात्र, रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की, घरातील आणि बाहेरील खेळांचा समावेश असलेल्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग देखील कोरोना संक्रमणाच्या वाढत्या जोखमीशी संबंधित होता.
टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या