labour ministry proposes 12 working hours in new draft rules
...तर कामाचे तास 'इतके' वाढणार; मोदी सरकार मोठा निर्णय घेणार? By कुणाल गवाणकर | Published: November 22, 2020 11:19 PM1 / 9कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर लाखो लोकांना पगार कपातीचा सामना करावा लागला. 2 / 9कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका अर्थव्यवस्थेला बसला. कोरोनाच्या धक्क्यातून देशाची अर्थव्यवस्था अद्यापही सावरलेली नाही.3 / 9देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. लवकरच कामगारांच्या कामांच्या तासांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.4 / 9कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास ८ तासांवरून १२ तास करण्याचा सरकारचा विचार आहे. कामगार मंत्रालयानं नुकताच संसदेला याबद्दलचा प्रस्ताव दिला आहे.5 / 9कामगार मंत्रालय सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती नियम २०२० मध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीचा प्रस्ताव श्रम मंत्रालयानं तयार केला आहे. 6 / 9१२ तासांच्या कामात मधल्या ब्रेकचादेखील समावेश असेल. या प्रस्तावात आठवड्याच्या कामाचे तास ४८ असतील, असं नमूद करण्यात आलं आहे. सध्याच्या नियमानुसार आठवड्याचे तास अठ्ठेचाळीसच आहेत.7 / 9कामाच्या तासात वाढ केल्यानं ओव्हरटाईमचा भत्ता मिळेल. त्यामुळे अधिकचा भत्ता मिळून त्यांची कमाई वाढेल, अशी माहिती कामगार मंत्रालयातल्या एका अधिकाऱ्यानं दिली.8 / 9आठ तासांपेक्षा अधिक काम केल्यास सर्व कामगारांना ओव्हरटाईम मिळू शकेल, अशी तरतूद नव्या प्रस्तावात करण्यात आली आहे.9 / 9१५ ते ३० मिनिटांचा ओव्हरटाईम केल्यास तो ३० मिनिटं मोजण्यात येईल, अशी तरतूद नव्या प्रस्तावात आहे. सध्या भत्ता मिळवण्यासाठी किमान ३० मिनिटांचा ओव्हरटाईम आवश्यक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications