Lal bahadur shashtri : पंतप्रधान असतानाही कार घेण्यासाठी 5 हजारांचे कर्ज घेणारे शास्त्री By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2021 8:53 AM
1 / 12 पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काही दिवसांपूर्वी विमान प्रवासाचा फोटो व्हायरल झाला होता. अमेरिकेला जाताना मोदींनी विमानप्रवासात वेळ वाया न घालवता पेपर वर्क केल्याचं दिसलं. 2 / 12 मोदींचा फोटो व्हायरल झाल्यानंतर दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, इंदिरा गांधी यांसह लाल बहादूर शास्त्री यांचाही फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये, आपल्या पत्नीसह ते विमानप्रवास करत होते. 3 / 12 विमान प्रवासात शास्त्री हे पेपर वाचताना दिसले, त्यावेळी त्यांच्या साधेपणाचीही चांगलीच चर्चा रंगली होती. आज लाल बहादूर शास्त्री यांची वी जयंती साजरी होत आहे. त्याबद्दल त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन 4 / 12 लाल बहादूर शास्त्री यांच्या साधेपणाचे आणि प्रामाणिकपणाचे अनेक किस्से नेहमीच सांगितले जातात. त्यापैकी, काहींच्या आठवणींना आपण आज उजाळा देणार आहोत. 5 / 12 जय जवान-जय किसानचा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान पदावर असतानाही त्यांचे पाय जमीनीवर होते, आपला इतिहास आणि घरातील संस्कारांची शिंदोरी त्यांनी कायम जपली. 6 / 12 एकदा उन्हाळ्याच्या दिवसात सरकारकडून शास्त्रींच्या घरात एक कुलर बसवण्यात आला होता. मात्र, नको त्या सवयी लागतील म्हणून त्यांनी तो परत पाठवला. 7 / 12 गरिबीचे चटके सोसलेल्या शास्त्रींनी त्यांचे जुने कपडे कधीच टाकून दिले नाहीत. जुन्या कपड्यांपासून ते हातरुमाल बनवून घ्यायचे. 8 / 12 १९६५ च्या दरम्यान देशानं मोठ्या दुष्काळाचा सामना केला.तेव्हा शास्त्री यांनी देशातील नागरिकांना उपवास करण्याचं आवाहन केलं होत. विशेष म्हणजे शास्त्री यांनी सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबाला उपवास करायला लावला. 9 / 12 १९५६ मध्ये तामिळनाडूत झालेल्या रेल्वे अपघातात १४२ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्री यांनी स्वत:हून रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. 10 / 12 शास्त्रीजींच्या मुलानं एकदा सरकारी गाडी वापरली, तेव्हा त्यांनी किलोमीटरच्या हिशोबानं पैसे जमा केले. 11 / 12 शास्त्रीजींनी पीएनबी बँकेकडून 5000 रुपयांचे कर्ज घेऊन चारचाकी गाडी खरेदी केली होती. त्यावेळी फिएट कंपनीच्या कारची किंमत 12000 रुपये होती. 12 / 12 शास्त्रीजी जिवंतपणी हे कर्ज फेडू शकले नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर पीएनबीने त्यांच्या पत्नीकडे कर्जाची रक्कम अदा करण्यासाठी संपर्क केला होता, असे त्यांचे सुपुत्र अनिल शास्त्री यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. आणखी वाचा